रत्नागिरीच्या माजी आमदार सौ. कुसुमताई रामचंद्र अभ्यंकर यांचा आज स्मृतिदिन

जन्म - 28 फेब्रुवारी, 1936
मृत्यू - 05 एप्रिल, 1984
राजकारणापलीकडे सौ. कुसुमताई या मराठी लेखिकाही होत्या. त्यांनी कथा, कविता, नाटक, प्रवासवर्णन आणि कादंबरी या प्रकारचे लेखन केले. पुण्यात जनमलेल्या कुसुमताईंनी संपूर्ण इंग्रजी हा विषय घेऊन M.A. केले होते. त्यापूर्वी त्यांना B. A. साठी कोल्हापूर विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यांनी नाट्य, गायन, खेळ यांबरोबरच वक्तृत्वात भाग घेतला. नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्या कुसुमताई त्यांच्या डाॅक्टर पतीना त्यांच्या व्यवसायात मदतही करत असत.
कुसुमताई दोन वेळा (1978 आणि 1980) रत्नागिरी मतदार संघातून आमदार म्हणून निवडून गेल्या होत्या.त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात भरीव कामे त्यांनी केली त्यापैकी प्रामुख्याने सांगण्याजोगे - रत्नागिरीतील Government Polytechnic ची सुरूवात झाली.
तपस्या नावाच्या एका जीपमधून कुसुमताई गावोगावी फिरत असत. गावोगावी रस्ते व्हावेत यासाठी कुसुमताई खूप झटल्या. अनेक गावांत कुसुमताईंच्या कार्यकाळात वीज पोचली.
कुसुमताईंनी लिहिलेल्या काही पुस्तकांची नावे प्रातिनिधिक स्वरूपात -
□ अतृप्त मी (कादंबरी) , □कठपुतळी (कादंबरी),
□आव्हान (अनुवादित, मूळ लेखिक- जेम्स हॅडली चेस
□कशी मोहिनी घातली (कादंबरी), □गोधडी (कथासंग्रह, सहलेखक - डाॅ. प्रकाश अत्रे). या पुस्तकात कुसुम अभ्यंकर यांच्या चार आणि प्रकाश अत्रे यांच्या 10 लघुकथा आहेत. ,
□चौदाव्या मजल्यावरून (कादंबरी) , □जातो मी दूर देशी (कादंबरी) , □जांभ्या दगडाचे डोळे (कादंबरी),
□जीवनदान (कादंबरी)
सेवासाधनेचे मूर्तीमंत स्वरूप म्हणजे स्वर्गीय कुसुमताई अभ्यंकर. मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषांमधील दर्जेदार पुस्तकांच्या वाचनाचा व्यासंग जोपासत असतानाच सातत्यपूर्ण जनसंपर्काच्या माध्यमातून लोकप्रियता जपली. वाचन व लेखनाच्या व्यासंगामुळेच त्या रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या कार्यवाह म्हणून काम पहात होत्या.
चुलीपर्यंत जाणाऱ्या लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या आमदार, सामाजिक बांधिलकी जपत सहभोजनाचे उपक्रम राबवणाऱ्या समाजधुरीण, स्त्रियांच्या समस्या दूर करणाऱ्या महिलांच्या हक्काची मैत्रीण अशा एक ना अनेक भूमिका त्यांनी लीलया पार पाडल्या. खुद्द शरद पवार यांनी त्यांचे कौतुक केले आहे. सर्वपक्षीय स्नेह जपणाऱ्या कुसुमताई रत्नागिरीत भाजपाच्या वृद्धीसाठी अहोरात्र झटल्या. त्याबरोबरच त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महिला संघटन मजबूत केले. आजाराने ग्रस्त असतानादेखील त्यांनी पक्षाचे काम थांबू दिले नाही. आपला उत्तराधिकारी म्हणून त्यांनी स्वर्गीय शिवाजीराव गोताड यांचे नाव सुचवले. आपल्या कार्याने पक्षश्रेष्ठींना प्रभावित केले असल्याने कुसुमताईंचा शब्द प्रमाण मानून पुढील काळात गोताड साहेबांना नेतृत्त्व करण्याची संधी पक्षाने दिली.
आज त्यांच्या निधनाला 40 - वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांनी दिलेला लोकसेवेचा वसा आम्ही पुढे चालूच ठेऊ.
कुसुमताईंच्या पवित्र स्मृतीस रत्नागिरी मिडीया परिवाराकडून विनम्र अभिवादन 💐💐🙏🙏🙏💐💐
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.
माहिती स्त्रोत- बाळासाहेब माने,माजी आमदार, रत्नागिरी.
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.