|| श्री ||
आज 09 एप्रिल, 2024
हिंदू नववर्ष दिन - गुढीपाडवा -
रत्नागिरी जिल्हा विकसीत जिल्ह्यांमध्ये गणला जातो. जिल्ह्याचा झालेला विकास, वाढत असणाऱ्या सोयीसुविधा, जिल्ह्यातून विविध स्तरांवर विविध क्षेत्रात सहभाग घेणारे, आदि सर्वच बाबतीत जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होताना दिसत आहे.
घडणाऱ्या बदलांची काळानुरूप नोंद ठेवण्यासाठीच दिनांक - 01 जून, 2021 पासून मी वेगळ्या पद्धतीने नोंद घेत आहे. गेल्या वर्षीपासून म्हणजेच 01 जून, 2023 रत्नागिरी जिल्ह्यासोबतच पालघर - ठाणे - रायगड - सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील माहितीही देत आहे.
जिल्ह्यातील ह्या महत्वाच्या घटना रोजच्या रोज दैनंदिन स्वरूपात म्हणजेच दैनंदिनीच्या रूपाने देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे दैनंदिनी म्हणून माहिती देणारा रत्नागिरी जिल्ह्यातील ' रत्नागिरी मिडीया ' हा पहिलाच उपक्रम.
इतके दिवस मी माझ्याकडील माहिती रत्नागिरी मिडीया या फेसबुक पेजवर प्रकाशित करत होतो. मात्र आज 09 एप्रिल, 2024 (गुढीपाडवा) पासून ही माहिती या वेबसाईट वर प्रकाशित करत आहे.
आजपर्यंत दिलेल्या पोस्टमध्ये शैक्षणिक - सामाजिक - सांस्कृतिक - क्रीडा - चित्रकला इ. विविध क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्ती व संस्थांची माहिती दिली आहे.
रत्नागिरी मीडिया हे माझे फेसबुक पेज सुरू केल्यापासून जवळपास 3000+ पोस्ट मी दिल्या आहेत. त्यात पोस्ट, व्हिडिओज्, रील्स इत्यादींचा समावेश आहे.
येत्या 31 मे, 2024 रोजी माझ्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाला तीन वर्षे पूर्ण होतील याचा मला विशेष आनंद होत आहे. नवीन वर्षांत आणखी सुधारणा नक्कीच होतील यात शंका नाही.
परंतु तरीही कुठेतरी त्याला मूर्त स्वरूप यावे यासाठी प्रयत्न सुरू करत आहे. यामध्ये तारखेत एखाद्या वेळेस फरक पडू शकतो.
ही माहिती गोळा करताना मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खूप लोकांची मदत झाली आहे व अजूनही होत आहे.
माझ्या ह्या प्रयत्नाविषयीचे आपले मत नक्की कळवा. माझा whatsapp नंबर - 8623862906 असा आहे. किंवा email - rgogate1962@gmail.com वर ई-मेलद्वारा जरूर कळवावे. आपल्याला काही माहिती जरी पाठवायची असेल तरी तीही याच संपर्काद्वारे कळवावी.
- दत्तात्रय (राजन )विनायक गोगटे,
संपादक,
रत्नागिरी मिडीया.