आज 20 डिसेंबर -
रत्नागिरी येथील खलवायन संस्थेचे प्रमुख गायक नट
आनंद केशव प्रभुदेसाई यांचा आज स्मृतिदिन -
जन्म - 21 जुलै, 1963
मृत्यू - 20 डिसेंबर, 2017
आनंद प्रभुदेसाई यांचा जन्म 21 जुलै, 1963 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील जामसंडे येथे झाला. बी. कॉम. पदवी घेतल्यानंतर संगीत शिक्षण संगीत विषयांतील एम. ए. ही पदवी मिळवली. उत्तम गायक नट म्हणून त्यांचा परिचय होता.
संगीत शिक्षणात डॉ. भारती वैशंपायन व अरुण कुलकर्णी कोल्हापूर तसेच डॉ. अशोक रानडे, मुंबई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले होते. तर नाट्यसंगीत अभिनयासाठी मा. कै. श्रीमती जयमाला शिलेदार पुणे यांचेकडून मार्गदर्शन लाभले.
खलवायन संस्था, रत्नागिरी निर्मित संगीत स्वरयात्री या नव्या संगीत नाटकाद्वारे संगीत रंगभूमीवर पदार्पण केले.
खलवायन रत्नागिरी संस्था निर्मित सादर झालेल्या संगीत घनअमृताचा / संगीत शांतिब्रम्ह / संगीत राधमानस तसेच संगीत कट्यार काळजात घुसली या चारही नाटकाकांसाठी
महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट गायन / अभिनयाचे रौप्य पदक प्राप्त झाले होते.
नवीदिल्ली येथील सन 2002-03 च्या नाट्यस्पर्धेत उत्कृष्ट गायक अभिनेता म्हणून प्रथम पारितोषिक मिळाले होते.
46व्या राज्य नाट्य स्पर्धेत संगीत राधमानस या नवीन संगीत नाटकाकरिता संगीत दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक तर 49 व्या राज्य नाटय स्पर्धेत संगीत ऐश्वर्यवती या नवीन संगीत नाटकाकरिता संगीत दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक मिळवले होते.
या व्यतिरिक्त अखिल भारतीय नाटय परिषदेचे विविध पुरस्कार त्यांनी प्राप्त केले होते.
याशिवाय अनेकदा आकाशवणीवरही त्यांचे कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.
मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा, कारवार इत्यादि ठिकाणच्या गायन मैफिलीत त्यांनी आपल्या गायनाचे सादरीकरण केले होते.
कट्यार काळजात घुसली या नाटकातील खांसाहेबांच्या भूमिकेसाठी पं. प्रभाकर कारेकर, मुकुंदराव मराठे, डॉ. रंजन दारव्हेकर , सौ . अर्चना कान्हेरे, श्रीमती बकुळ पंडित , पं. रघुनंदन पणशीकर, आदि नामवंत कलाकारांनी प्रभुदेसाईंची प्रशंसा केली होती.
त्यांनी संगीत नाटकांविषयी ' इ. स. 1960 नंतरच्या मराठी नाटकांतील नाट्य संगीताचे स्वरूप ' याविषयावर चालू केलेले पी. एचडी. चे काम मात्र त्यांच्या अकाली जाण्याने अर्धवट राहिले.
अशा ह्या हुन्नरी कलाकाराचे 20 डिसेंबर, 2017 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
आनंद यांच्या पवित्र स्मृतीस रत्नागिरी मिडीया परिवाराकडून विनम्र अभिवादन 💐💐💐
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी .
माहिती स्रोत - श्रीनिवास जोशी, खलवायन, रत्नागिरी.
नावासह माहिती Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.