आज 16 एप्रिल - रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. ज. वा. तथा बाबूराव जोशी यांचा आज स्मृतिदिन .

रत्नागिरीसारख्या दुर्गम भागात स्त्री शिक्षणाचा पाया महिला विद्यालयाची सन 1925 मध्ये करून रोवला.

 

भारतरत्न महर्षि कर्वे यांची पत्नी व बाबूरावांची आत्या बाया यांचेकडून बाबूराव व मालतीबाईनी संस्कार व स्त्री शिक्षणाचा वसा घेतला. 

 

 त्यानंतर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची  1933 साली स्थापना केली. गोगटे महाविद्यालयाची स्थापना सन  1945  मध्ये तर रा. भा. शिर्के हायस्कुल  1948 मध्ये सुरू केले. 

 

आज ह्या संस्थेचा पसारा खूप मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. त्या संस्थेच्या स्थापनेत तसेच प्रगतीत त्यांच्या सहचारिणी कै. सौ. मालतीबाई यांचेही योगदान विसरून चालणार नाही. 

 

त्याकाळात कोणत्याही प्रकारचे पोषक वातावरण नसताना धाडसाने ह्याप्रकारचे उपक्रम सुरू केले व स्वतःच्या योगदानानाने अविरतपणे चालू ठेवले.त्यावेळच्या उपलब्ध साधनांचा वापर करून व भावी पिढी चांगल्याप्रकारच्या शिक्षणाची संधी रत्नागिरी आणि परिसरातील विद्यार्थ्यांना  बाबूराव व सौ. मालतीबाई यांनी उपलब्ध करून दिली.  वेळोवेळी  आलेल्या आव्हानांना धैर्याने तोंड देत संस्थेचे कामकाज पुढे चालू ठेवले.  ज्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात एवढे मोठे नाव / यश / कीर्ति संस्थेने मिळवले  आहे. हे वैभव विकत घेतले जाऊ शकत नाही. 

 

आजच्या दिवशी सन 1980 मध्ये दुःखद निधन झाले.  

 

बाबूरावांच्या पवित्र स्मृतीस रत्नागिरी मीडिया परिवारातर्फे तसेच, वैयक्तिक आमच्या कुटुंबियांकडून विनम्र अभिवादन 

💐🙏🙏🙏💐

 

माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी. 

माहिती स्रोत - विविध लेख आणि बातम्यांवरून साभार. 

माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.