आज - 13 डिसेंबर - राजकारणात असून राजकारणी नसलेले व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित असलेले रत्नागिरीचे पहिले थेट नगराध्यक्ष डॉ. जगन्नाथ शंकर तथा नानासाहेब केळकर यांचा स्मृतिदिन -

आज  - 13 डिसेंबर  - 

 

राजकारणात असून राजकारणी नसलेले व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित असलेले रत्नागिरीचे पहिले थेट नगराध्यक्ष डॉ. 

जगन्नाथ शंकर तथा नानासाहेब केळकर यांचा  

स्मृतिदिन  - 

 

जन्म  - 17 ऑगस्ट,  1927

मृत्यू  - 13 डिसेंबर,  2010

 

डाॅ. जगन्नाथ यांचा जन्म मालगुंड ता. रत्नागिरी येथे 17 

आॅगस्ट, 1927 रोजी झाला. शालेय शिक्षण फाटक 

हायस्कूल रत्नागिरी येथे पूर्ण केल्यानंतर मुंबई येथून 

वैद्यकीय  पदवी घेऊन रत्नागिरीतील राधाकृष्ण नाक्यावर  प्रॅक्टिस सुरू केली. डॉक्टर ग्रामीण भागातील रुग्णांसाठी 

आपली सेवा देत असत. गरीब रुग्णांकडून नाममात्र शुल्क 

तर काही वेळेला मोफत सेवाही देत असत. 

पहिल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार असलेल्या डाॅक्टरनी राजकारणात आल्यानंतर जनसंघातर्फे व त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठेने शेवटपर्यंत काम केले. 

 

□□ डॉक्टरांचे वैयक्तिक / कौटुंबिक आयुष्याविषयी थोडेसे - एकूण 4 - भावंडांचे हे कुटुंब. यामध्ये 03 - भाऊ  व 01 - बहीण. यात भावांमध्ये डॉक्टरांचा दुसरा क्रमांक. पत्नी 

प्रभावती यांची उत्तम साथ असल्यामुळेच डाॅक्टरना 

राजकीय व सामाजिक जबाबदाऱ्या उत्तमपणे सांभाळणे 

अतिशय सुकर झाले. डॉक्टरना एकूण 03 - अपत्ये -  

02 - मुली व 01 मुलगा  तिन्ही विवाहित व आपापल्या 

उद्योग व्यवसायात उत्तम प्रकारे सुस्थितीत.  

 

जनसामान्यांत ते नानासाहेब म्हणून अधिक परिचयाचे 

आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व होते.ते वैयक्तिक जीवनातही शिस्तप्रिय म्हणूनच ओळखले जायचे. डॉक्टर उत्तम 

टेनिसपटू होते हेही विसरून चालणार नाही. 

याखेळाव्यतिरिक्त कबड्डी व कुस्ती या दोन खेळांची विशेष 

आवड होती. 

डॉ. केळकर सन 1965 मध्ये पहिल्यांदा जनसंघातर्फे  

नगरसेवक झाले. 1967  ते 1971 या कालावधीत दोन वेळा 

त्यांनी नगराध्यक्षपद भूषविले. सन 1974  ते  1981 या कालावधीसाठी ते रत्नागिरी नगराचे प्रथम थेट नगराध्यक्ष 

म्हणून विराजमान झाले व कारकीर्द गाजविली. त्यावेळेस 

राज्यात सर्वत्र काँग्रेसचे थेट नगराध्यक्ष निवडून आले होते, 

मात्र अपवाद म्हणून राज्यात जनसंघाचे 2 च नगर 

परिषदांमध्ये थेट नगराध्यक्ष निवडून आले होते त्यापैकी 

एक म्हणजे रत्नागिरीतून डॉ. केळकर.

डाॅक्टरांनी 12 वर्षे नगराध्यक्ष म्हणून उल्लेखनीय काम केले. 

त्यांच्याच कार्यकालामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, व्यायाम शाळा, नवीन भाजी मार्केट, शाळा क्रमांक दोनची इमारत, वेदपाठशाळा आदि अनेक समाजोपयोगी कामे यशस्वीरित्या पूर्ण झाली. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय, भागोजी शेठ विधी महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले.

त्यांच्या लेखी सर्व जाती, धर्म, पंथ, वर्ग, क्षेत्र, हे समान पातळीवरच असल्यामुळे सर्व स्तरातील व्यक्तींमध्ये त्यांचे 

नाव आजही आदराने घेतले जाते. त्यामुळेच रत्नागिरीमध्ये 

डाॅ.  केळकर यांची ख्याती राजकारणापलीकडील लोकमान्य 

नेते अशी होती.

ज्या- ज्यावेळेस रत्नागिरीचे आणि रत्नागिरीमध्ये झालेल्या विकासकामांचे नाव निघते  तेव्हा तेव्हा डॉ. केळकर यांचेच 

नाव जनतेच्या तोंडी पहिल्यांदा येते .

फक्त राजकारणातच असे नाही रत्नागिरीतील 

समाजकारणातही त्यांचे काम वैशिष्ट्यपूर्ण असेच म्हणावे 

लागेल. रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र भाजप 

प्रदेश सदस्य, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी तसेच, न्यू एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्षपद त्यांनी भूषवले.

याशिवाय त्यांनी जिल्हा कुस्ती असोसिएशन व जिल्हा 

कबड्डी असोसिएशनचे या दोन्ही संघटनांचे  संस्थापक - 

अध्यक्ष आणि स्थापना वर्ष  1973 पासून सलग 30 - 

वर्षे एवढ्या प्रदीर्घ कालावधीसाठी अध्यक्षपद भूषविले. 

तसेच बॅडमिंटन असोसिएशनचेही संस्थापक अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे नगराध्यक्षपद सांभाळून रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्षपदी होते. भगवती मंदिर जीर्णोद्धार 

समिती, भागोजीशेठ कीर स्मारक समिती, कवी केशवसुत 

स्मारक समिती, सन  1990 साली रत्नागिरी येथे भरलेल्या 

64 - व्या  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 

स्वागत समिती, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती, डॉ. बाबासाहेब 

आंबेडकर स्मारक समिती आदि संस्थांचे अध्यक्षपद भूषवलं.

सन 1978  व 1990 साली महाराष्ट्रातल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांकडून उमेदवारी जवळपास निश्चित झाल्यानंतर देखील ऐनवेळी पक्षीय पातळीवरील राजकीय घडामोडींमुळे दोन 

वेळा आमदारकीचे  तिकीट त्यांना नाकारण्यात आलं. परंतु त्याहीवेळी कोणत्याही स्वरूपातील बंडखोरी किंवा नाराजी 

व्यक्त न  करता पक्षादेश शिरसावंद्य मानून पक्षाच्या अधिकृत  उमेदवारांना तन-मन-धन अर्पून विजयी करण्यात त्यांनी 

योगदान दिलं.

डाॅक्टरांची एकूणच कारकीर्द नवीन  पिढीच्या राजकारण्यांना       आदर्शवत आहे यात शंकाच नाही.  

 

□ वैद्यकीय सेवेसाठी धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित. 

 

डॉ. जगन्नाथ शंकर केळकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. 💐🙏🙏🙏💐

 

माहिती संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे,  रत्नागिरी.

माहिती स्त्रोत - डाॅ.  चंद्रशेखर जगन्नाथ केळकर, रत्नागिरी. 

माहिती नावासह Like,  Share  &Forward करण्यास हरकत नाही.