आज - 09 डिसेंबर -
रत्नागिरीमधील जेष्ठ बॅडमिंटन खेळाडू आणि बॅडमिंटन
प्रशिक्षक आणि कलाप्रेमी नागरिक मदन चव्हाण यांचा
प्रथम स्मृतिदिन -
रत्नागिरीमधील बॅडमिंटन खेळाला आजचे भव्य स्वरूप देण्यासाठी आणि या खेळाला सातत्त्याने प्रगतीपथावर
नेण्यासाठी प्रयत्न करणारे बॅडमिंटनचे आद्य प्रशिक्षकांपैकी एक अशी
मदन चव्हाण यांची ओळख होती.
रत्नागिरीमध्ये केंद्र शासनाच्या पोस्ट खात्यामध्ये नोकरी
करत असतांनाच त्यांच्यामधील खेळाडू वृत्तीने अतिशय
प्रतिकूल परिस्थितीमध्ये अगदी लहान वयातील नवोदित खेळाडूना बॅडमिंटनचे प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून
दिली. त्यांच्या प्रशिक्षणामुळे रत्नागिरीमध्ये अनेक खेळाडूंनी प्राथमिक धडे
घेऊन स्पर्धात्मक खेळांमध्ये पुढे चांगले यश मिळविले आहे.
स्वत: बॅडमिंटनपटू असलेले मदन चव्हाण यांनी पोस्ट
खात्याच्या अनेक राज्य आणि अखिल भारतीय
पातळीवरील बॅडमिंटन स्पर्धामध्ये अनेकदा विजेतपद
मिळविले होते.
सामाजिक क्षेत्रामध्येही बहुआयामी व्यक्ती म्हणून मदनसर
हे प्रसिध्द होते. रत्नागिरीमधील खालची आळी मार्गशीर्ष
गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जवळपास
12 वर्षे काम पाहिले होते. त्याचप्रमाणे मंगलमूर्ती
स्पर्धेमध्येही परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
एक संयमी आणि प्रसिध्दीपरान्मुख असे हे व्यक्तिमत्व
होते. साहाजिकच रत्नागिरी शहरातील व परिसरातील
सर्वच क्षेत्रामध्ये त्यांची मित्रमंडळी आहेत.
पोस्ट खात्यामध्येही अधिकारी म्हणूनही त्यांचे सर्वच
कर्मचारी वर्गाशी अगदी जिव्हाळ्याचे संबध होते.
आजारपणामुळे त्यांनी काही वर्षांपूर्वीच प्रशिक्षणाचे वर्ग
थांबविले होते.
मदन चव्हाण यांचे गेल्यावर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 82 वर्षे होते.
मदन सरांच्या पवित्र स्मृतीस रत्नागिरी मीडिया परिवाराकडून विनम्र अभिवादन 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.