दिलीप बळवंत वेंगसरकर यांचा जन्म 06 एप्रिल, 1956 रोजी राजापूर येथे झाला. भारतीय क्रिकेट खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्द त्यांनी 1975 - 76 साली न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड येथील सामन्याने सुरू केली. त्यांच्या काळात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण शैली असलेले फलंदाज म्हणून ते प्रसिद्ध होते. अतिशय तडाखेबंद आणि उत्तम चौफेर फटकेबाजी करणारे म्हणून ते प्रसिद्ध होते. ' कर्नल ' या टोपणनावाने संघातील खेळाडू त्यांना बोलवत असत. 1983 च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचेही ते सदस्य होते. लॉर्ड्स मैदानावर लागोपाठ तीन कसोटी सामन्यांमध्ये शतके झळकावली. त्यांच्या या खेळामुळे भारताने इंग्लंडमधील कसोटी सामन्यांची मालिका जिंकली. वेंगसरकर मालिकावीर ठरले. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्टइंडिज आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध अनेकवेळा त्यांनी शतके झळकावली आहेत. काही वर्षे त्यांनी भारताच्या क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषविले .
आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात त्यांनी 21 फेब्रुवारी1976रोजी न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात पदार्पण केले होते. ■त्यांची आंतरराष्ट्रीय कसोटी कारकीर्द - फलंदाजी - सामने- 116, धावा - 6868, शतके - 17
■ आंतरराष्ट्रीय वनडे कारकीर्द- फलंदाजी - सामने - 129, धावा - 3508, शतके - 01 .
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून देण्यात येणारा सी. के. नायडू जीवनगौरव सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेले वेंगसरकर आजही उत्तम खेळाडू आणि प्रशिक्षक आहेत.
दिलीपसरना रत्नागिरी मीडिया परिवाराकडून वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे रत्नागिरी.
माहिती स्त्रोत - विविध बातम्यांवरून तसेच इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून साभार.
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.