जन्म - 05 एप्रिल, 1987.
सिद्धेश यांचा जन्म रत्नागिरी येथे 5 एप्रिल, 1987 रोजी झाला . प्राथमिक तसेच शालेय शिक्षण रत्नागिरीतील फाटक हायस्कूल येथून पूर्ण करून महाविद्यालयीन शिक्षण गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात घेतले आहे. ते वाणिज्य पदवीधर ( B. Com .) आहेत.
सिद्धेश यांचा पिढीजात ज्वेलर्सचा व्यवसाय असून बाबूभाई बंदरकर ज्वेलर्स या नावाने रत्नागिरी शहरात पेढी आहे.
आपला व्यवसाय सांभाळून सिद्धेश वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करण्याचा व्यवसाय आहे. दिल से क्रिएशन या सांस्कृतिक कला गृपमध्ये ते गेली 20 वर्षे सक्रिय सहभाग घेतात.
संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या जरा झूम या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे गेली 14 वर्षे सिद्धेश यशस्वी आयोजन करत आहेत.
दीपोत्सव, बालसुधारगृहामधील मुलांसाठी स्नेहबंध अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यंग 08 या गृपच्या माध्यमातून रंग दे रत्नागिरी, रत्नागिरी दांडिया नाईट अशासारखे कार्यक्रमांचे यशास्वीपणे पार पाडले आहेत.
बहर या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवातील पर्सनॅलिटी काँटेस्ट या कार्यक्रमाचे नियोजन, कोरिओग्राफी व निवेदनाची जबाबदारी सिद्धेश यांचेकडे असते.
सिद्धेश यांना रत्नागिरी मीडिया परिवारातर्फे वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.