आज  29 मार्च  - रत्नागिरीतील प्रतिथयश व्यावसायिक, उत्तम बॅडमिंटनपटू,अनेक क्रीडा व सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे आधारस्तंभ असलेले प्रसन्नशेठ योगेश्वर तथा भैय्याशेठ आंबुलकर यांचा वाढदिवस  -

आज  29 मार्च  - 

 

रत्नागिरीतील प्रतिथयश  व्यावसायिक, उत्तम बॅडमिंटनपटू,

अनेक क्रीडा व सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे आधारस्तंभ असलेले नावाप्रमाणेच प्रसन्न असे व्यक्तिमत्व प्रसन्नशेठ 

योगेश्वरआंबुलकर तथा भैय्याशेठ आंबुलकर यांचा 

वाढदिवस  - 

 

जन्म  - 29 मार्च, 1959 

 

प्रसन्न यांचा जन्म रत्नागिरी येथे 29 मार्च, 1959  रोजी 

नोकरदार कुटुंबात झाला. त्यांचे वडील योगेश्वर सर हे जिल्हा परिषदेत उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. प्रसन्न हे भैय्या म्हणून अधिक परिचित आहेत. त्यांचे शालेय शिक्षण रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये झाले. मुंबई विद्यापीठाचे वाणिज्य पदवीधर (B. Com.) असलेल्या भैय्या यांचे महाविद्यालयीन शिक्षण गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झाले आहे. त्यांचे आजोबा (आईचे वडील) कृष्णराव चवंडे 

यांनी सुरू केलेल्या ' रत्नागिरी वाईन मार्ट'  हा व्यवसाय आजोबांचे निधन झाल्यामुळे सांभाळायला सुरुवात केली. 

भैय्या यांनी आपल्या व्यवसायात आपले स्वतंत्र अस्तित्व 

निर्माण केले असून यावर्षी व्यावसायिक कारकीर्दीतील 

50 - वर्षांचा मोठा टप्पा गाठला आहे.  

शिक्षण पूर्ण झाल्यावर व व्यावसायिक जबाबदारी 

सांभाळायला लागल्या नंतर दरम्यानच्या काळात त्यांचा 

विवाह  09 जुलै 1989 रोजी झाला. प्रसन्नशेठ यांना एकच 

सुविद्य मुलगा पार्थ प्रसन्न आंबुलकर उच्च शिक्षित (शिक्षण - एम.बी. ए.) घेऊन सुद्धा आपल्या वडिलांची व्यावसायिक 

धुरा आज तोही उत्तम रीतीने सांभाळत आहे.  

भैय्या हे उत्तम बॅडमिंटनपटू आहेत. अनेक ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला असून मानाची दोन पारितोषिके मिळवली आहेत . 

इतर कोणत्या प्रकारे समाजाचे देणे फेडण्यापेक्षा आपल्या आवडीच्या म्हणजे बॅडमिंटन व बुद्धीबळ या खेळांच्या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत  रत्नागिरीमधील बॅडमिंटन खेळाची एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.  यामध्ये भैय्या यांचे मोलाचे योगदान आहे.  

रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्षपद 

भूषविलेले आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत असोसिएशनचे माध्यमातून 03 - राज्यस्तरीय बॅडमिंटन 

स्पर्धांचे आयोजन केले होते.  

तसेच उदयोन्मुख, होतकरू शालेय बॅडमिंटन खेळाडूंना चांगले स्पर्धात्मक खेळाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी मुंबईतील नामांकित बॅडमिंटन खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी बोलावून सुट्टीत बॅडमिंटन प्रशिक्षण(Camp) वर्गाचे आयोजन केले होते.  

याबरोबरच प्रसन्न शेठ हे रत्नागिरी चेसमेन या बुद्धीबळ खेळाशी निगडित क्रिडा संघटनेचे 20 - वर्षे एवढा प्रदीर्घ काळ अध्यक्ष होते.  त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत 03 - राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन केले होते.  त्याचप्रमाणे 01  - राष्ट्रीय स्तरावरील बुद्धीबळ स्पर्धा उत्तम रीतीने पार पाडली होती.  या स्पर्धेसाठी जागतिक फिडे मानांकित खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.  

रत्नागिरी जिल्ह्यातील बॅडमिंटन प्रमाणेच बुद्धीबळ खेळातील होतकरू बुद्धीबळपटू तयार होवून नावारूपाला यावेत यासाठी आजही कायम प्रयत्नशील असतात.  

जिल्ह्यात खेळांचा विकास व्हावा यासाठी नवनवे उपक्रम तसेच स्पर्धांच्या आयोजनासाठी त्यांचा मदतीचा हात कायम पुढे असतो.

मान. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय रत्नागिरी जिल्हा क्रीडा परिषदेचे प्रसन्नशेठ 05 - वर्षे सदस्य म्हणून काम पहात होते ही त्यांच्या क्रीडा क्षेत्रात केलेल्या 

कामाची एकप्रकारे पोच पावती म्हणावी लागेल.  

सध्या प्रसन्नशेठ रत्नागिरी सिटी बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.  

10 - वर्षे रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे सदस्य राहिलेले भैय्याशेठ

खेळाडूंना सर्वतोपरी मदत ही बाब सोडून सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक शैक्षणिक सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना, गरजू विद्यार्थ्यांना तसेच व्यक्तीना वेळोवेळी मदत करत आहेत.  

भैय्याशेठ यांनी निगर्वी व्यक्तिमत्त्व. स्वतःला  प्रसिद्धी पासून कायम दूर ठेवणे ते पसंत करतात.  

 

क्रीडाप्रेमी प्रसन्नशेठना रत्नागिरी मिडीया परिवाराकडून तसेच वैयक्तिक आमच्या कुटुंबीयांकडून वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा 💐🌹🎂🍩🌹💐

 

माहिती संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे,  रत्नागिरी. 

माहिती नावासह Like,  Share  & Forward  करण्यास हरकत नाही.