प्रमुख गायक अभिनेत्री आणि दापोलीतील आघाडीच्या गायिका प्रियांका ऋत्विक दाबके - बापट यांचा वाढदिवस -
जन्म - 14 एप्रिल, 1995.
प्रियांका यांचा जन्म दापोली येथे 14 एप्रिल, 1995 रोजी झाला. शालेय शिक्षण ए. जी. हायस्कूल, दापोली येथून पूर्ण केले आहे. त्या कला शाखेच्या पदवीधर आहेत. प्रियांका यांना गायनाची लहानपणापासूनच आवड आहे. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये शालेय जीवनापासूनच सहभाग नोंदवला असून बक्षिसेही मिळविली आहेत.
त्यांचे गायनातील गुरू - सौ. वीणा महाजन आणि विदुषी शाल्मली जोशी हे आहेत तर नाट्यसंगीतातील गुरू देविदास दातार हे आहेत.
प्रियांका ह्या लहानपणापासून गायन सेवा करत आहेत तर रंगभूमीवर संगीत नाटकांच्या माध्यमातून रंगभूमीची सेवा गेली 8 ते 9 वर्षे करत आहेत.
अनेक संगीत नाटकांत त्यांनी प्रमुख गायक अभिनेत्रीची भूमिका पार पाडली आहे. मात्र संगीत शारदा या नाटकाने त्यांची खरी ओळख निर्माण झाली.
आतापर्यंत सं. शारदा, सं. सौभद्र, सं. हे बंध रेशमाचे, सं. जय जय गौरी शंकर, सं. स्वरसम्राज्ञी अशा सारख्या नाटकांमध्ये काम केले आहे.
सन 2019 मध्ये प्रियांका यांचा विवाह दापोली येथील ऋत्विक यांचेशी झाला आहे. आता त्या पतींसोबत दापोली येथे हॉटेल मँगो इन हा हॉटेल व्यवसाय सांभाळत आहेत. त्या गंध स्वरांचा या दापोलीतील सांस्कृतिक संस्थेच्या सदस्य आहेत.
व्यवसाय सांभाळून त्या गाण्याचे कार्यक्रम करतात, त्याबरोबरच नाटकांमधूनही गायक अभिनेत्रीचे काम करतात.
घरामधील सर्व सदस्य आजी, पती ऋत्विक व कुटुंबीय यांचे त्यांना प्रोत्साहन त्याचबरोबर वेळोवेळी पाठिंबा मिळत असतो.
अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला असून अनेक पारितोषिके मिळवली आहेत.
सन 2018 मध्ये सिंधुताई सकपाळ यांचे हस्ते मिळालेला सांस्कृतिक रत्न पुरस्कार हा त्यापैकी विशेष उल्लेखनीय.
प्रियांका यांना रत्नागिरी मीडिया परिवारातर्फे
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 💐🍩🎂🍩💐
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.
माहिती स्रोत - श्रीनिवास जोशी, रत्नागिरी.
माहिती नावासह Like & Share करण्यास हरकत नाही.