आज - 22 डिसेंबर - रत्नागिरी जिल्ह्यातील वेदशास्त्रसंपन्न वेदमूर्ती षडंङवित् हृषीकेश अमित जोशी करजगाव ता. दापोली यांचा वाढदिवस -

आज - 22  डिसेंबर  - 

 

रत्नागिरी जिल्ह्यातील वेदशास्त्रसंपन्न वेदमूर्ती षडंङवित् 

हृषीकेश अमित जोशी करजगाव ता. दापोली  यांचा वाढदिवस  - 

 

जन्म - 22 डिसेंबर, 1997 

 

हृषीकेश यांचा जन्म दापोली तालुक्यातील करजगाव येथे 22 डिसेंबर, 1997 रोजी झाला. प्राथमिक शालेय शिक्षण इयत्ता चौथीपर्यंत गावातील शाळेत घेतल्यानंतर वयाच्या  10 - व्या वर्षी मालवण तालुक्यातील वायंगणी येथील घनपाठी वेदमूर्ती दत्तात्रय महादेव मुरवणे यांच्याकडून गुरूगृही राहून गुरूकुल पद्धतीने वेदाध्ययनाला सुरूवात करून सर्व वेदाध्ययन13 वर्षामध्ये त्यांच्याकडेच पूर्ण केल्यानंतर वेदाध्ययनातील विविध परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन आज वेदमूर्ती ही पदवी प्राप्त केल्यानंतर स्वगृही म्हणजे करजगाव या आपल्या जन्मगावी परत येवून वेदमूर्ती म्हणून ते रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत आहेत.  

सध्या शिक्षण क्षेत्रात उपलब्ध असलेल्या कोणत्याही विद्या शाखेची पदवी घेण्याचा मोह न ठेवता वैदिक शिक्षणामधील सर्वोच्च अशा प्रकारची वेदमूर्ती ही पदवी आत्मसात करण्याचे ठरवून त्यात आज हृषीकेश पारंगत झाले आहेत हे नक्कीच भूषणावह आहे.  

याआधी रत्नागिरीतील वे.आठल्ये गुरूजी हे पहिले वेदशास्त्रसंपन्न वेदमूर्ती म्हणून रत्नागिरी जिल्हा व महाराष्ट्रात प्रसिद्ध होते.  

दशग्रंथासहित  घनांत परीक्षा सन  2022 मध्ये उत्तीर्ण झाले असून अशा प्रकारची परीक्षा देणारे हृषीकेश हे जिल्ह्यातीलच  नाही तर संपूर्ण देशातील पहिले विद्यार्थी आहेत. 

 

□□ हृषीकेश यांनी आजपर्यंत दिलेल्या परीक्षा  - 

● 2013  समग्र ऋग्वेद संहिता परीक्षा - प्रथम श्रेणीत उत्तीर्ण 

● 2015  समग्र ऋग्वेद शाखा परीक्षा - प्रथम श्रेणीत

                उत्तीर्ण 

● 2017  विशेष परीक्षा:- समग्र ऋग्वेद समग्र शाखा,

          उपग्रंथासह म्हणजेच दशग्रंथासहित संपूर्ण ऋग्वेद

          परीक्षा  - प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. ही परीक्षा देणारा

          एकमेव विद्यार्थी.  

● 2018  षडंङवित्  ही पदवी प्राप्त केली.  

● 2019  ऋग्वेद पदपाठ परीक्षा  - प्रथम श्रेणीत उत्तीर्ण 

● 2020-21  ऋग्वेद जटापाठ व घनपाठ अध्ययन

            करून वायंगणी ता. मालवण येथील  ' ऋग्वेद

            गुरूकुल ' येथे गुरूकुलातील दोन     

            सहाध्यायांसोबत ऑक्टोबर,

           2021 मध्ये  ' घनपारायण '  करून घनपाठी ही

           पदवी प्राप्त केली.  

● 2021   घनपाठाची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण .

● 2022  दशग्रंथासहित घनांत परीक्षा उत्तीर्ण .

 

●○● हृषीकेश यांनी आजपर्यंत अनेक सामुहिक संहिता पारायण व स्वाहाकार  कार्यक्रमात सहभाग घेतला असून त्यापैकी  निवडक  - 

□ जवळपास  40 ऋग्वेद संहिता स्वाहाकारात सहभाग. 

□ सहस्त्रबुद्धे मठ,  पुणे  - दशग्रंथ पारायण व शाखा पारायण 

□ श्री क्षेत्र दत्तधाम, नाशिक. 

□ सहस्त्रबुद्धे मठ,  पुणे. 

□ ऋग्वेद गुरूकुल,  वायंगणी,  ता. मालवण. 

○○ऋग्वेद घनपारायण  - 

□ 2021  ऋग्वेद गुरूकुल,  वायंगणी,  ता. मालवण. 

□ 2021 - 22  सहस्त्रबुद्धे मठ,  पुणे. 

 

●○● आजपर्यंत वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे यांचे अनेक पुरस्कार हृषीकेश यांना मिळाले आहेत  - 

○ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुरस्कार. 

○  कै. कमल शरदचंद्र जोगळेकर पुरस्कार. 

○  कै. किंजवडेकर घनपाठी पुरस्कार. 

○  रजनी गंगाधर जोशी पुरस्कार.  

 

वेदमूर्ती षडंङवित् हृषीकेश यांना रत्नागिरी मिडीया 

परिवाराकडून वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा  

💐🌹🎂🍩🌹💐



माहिती संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी. 

माहिती स्त्रोत  - ओंकार गोविलकर, दापोली. 

माहिती नावासह Like,  Share & Forward करण्यास 

हरकत नाही .