आज 26 नोव्हेंबर -
□ भारतीय संविधान दिवस -
' भारताचे संविधान '
आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक 26 नोव्हेंबर,1949 रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
#धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविणाचा व सर्व नागरिकांस समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची शिकवण देणारे भारतीय संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंगिकृत आणि अधिनियमित करून देशाला अर्पण करण्यात आले होते.
संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो.
29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली.
अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर, 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सूपुर्द करतांना, 26 नोव्हेंबर, 1949 .
भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे 125 वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी 26 नोव्हेंबर, 2015 रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात 26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 24 नोव्हेंबर 2008 ला आदेश काढून '26 नोव्हेंबर' हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.
भारताचे संविधान आणि आणि त्यातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये यांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय, आणि विद्यापीठांमध्ये, 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येणार असून विद्यार्थी, शिक्षकांकडून या दिनाचे औचित्य साधून संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात येणार आहे.
यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिन देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच विविध सरकारी कार्यालये, पोलिस मुख्यालय, पोलिस महासंचालनालय यांच्यापासून ते प्रत्येक पोलिस ठाण्यातही संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे.
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी
माहिती स्त्रोत - विविध लेख व इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून साभार.
फोटो सौजन्य - इंटरनेट वरून साभार.
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.