आज 22 डिसेंबर - राष्ट्रीय गणित दिवस -

आज 22 डिसेंबर - 

 

राष्ट्रीय गणित दिवस - 

 

दरवर्षी 22 डिसेंबरला देश रामानुजन यांच्या योगदानाची आठवण काढतो . 

 

गणिता प्रति सर्वांनाच अभिरुची वाढावी यासाठी हा दिवस इतक्या मोठ्या पातळीवर साजरा केला जातो . अतिशय वेगाने नव्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी झोकून देणाऱ्या नवीन पिढीचा कल गणिताकडे वाढवणे हा त्यामागचा मुख्य हेतू  . 

 

श्रीनिवास अयंगर रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी कोईम्बतुरच्या ईरोड गावात झाला होता . ते एका ब्राम्हण कुटुंबात जन्मले होते. देश आणि जगातील काही महत्वपूर्ण गणिततज्ञांमध्ये त्यांचं नाव घेतले जाते. भारत सरकारने त्यांच्या जीवनकार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या जयंती निमित्ताने 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केला. 

वयाच्या  अवघ्या 32 व्या वर्षी रामानुजन यांचे निधन झाले . 2015 साली त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकणारा ' The Man Who Knew Infinity ' या चित्रपटात त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग चित्रित / साकारण्यात आले होते. 

 

गणित हा शाळेत किंवा एरवीच्या आयुष्यातही कठीण वाटावा असा विषय. परंतु तो  कठीण विषयही सहजरित्या अभ्यासून आपल्याला समजेल अशा पद्धतीने सोपा करून ठेवणारे अवलिया जसे जगात तसेच आपल्या भारतातही होवून गेले. 

 

आजच्या राष्ट्रीय गणित दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील 5  महान गणिततज्ञांविषयी अधिक माहिती - 

 

#श्रीनिवास रामानुजन

रामानुजन जेव्हा इंग्रजी विषयात नापास झाले तेव्हा त्यांनी शाळा सोडली. त्यानंतर ते गणित शिकले आणि आपली ओळख प्रस्थापित केली. त्यांनी गणितात 120 प्रमेय निर्माण केले. त्यासाठी केंब्रिज विद्यापीठाने त्यांना आमंत्रण धाडलं.

 

त्यांनी Analytical theory of numbers, Eliptical function आणि Infinite series या विषयांवर अभ्यास केला.

 

त्यांचाच जन्मदिन राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो.

 

#आर्यभट्ट

 

भारताचे सगळ्यांत पहिले गणितज्ज्ञ आर्यभटट् यांना मानलं जातं. असं म्हणतात की पाचव्या शतकात पृथ्वी गोल आहे, हा सिद्धांत त्यांनी मांडला आहे. सूर्याच्या चारी बाजूंना प्रदक्षिणा घालतोय. असं करण्यासाठी त्यांना 365 दिवसांचा वेळ लागतो.

 

भारताने जगाला शून्य दिला, ती आर्यभट्ट यांच्याच कामाची कृपा. त्यांच्या या योगदानामुळेच भारताच्या पहिल्या उपग्रहाला त्यांचं नाव देण्यात आलं होतं.

 

#शकुंतला देवी

 

शकुंतला देवी या भारतातल्या सगळ्यांत प्रसिद्ध महिला गणितज्ञ मानल्या जातात. त्यांना मानवी कॉम्प्युटरही म्हटलं जायचं, कारण त्या कोणत्याही कॅल्क्युटरविना आकडेमोड करायच्या.

 

त्या सहा वर्षांच्या होत्या, तेव्हापासूनच त्यांच्या प्रतिभेचा प्रकाश भारताच्या विविध विद्यापीठात पडायला सुरुवात झाली होती.

 

त्यांच्या नावावर अनेक विक्रमसुद्धा आहेत. त्यांनी जगातल्या सगळ्यात वेगवान कॉम्प्युटरपेक्षाही वेगाने 50व्या सेकंदाला 201चं 23वं वर्गमूळ काढलं होतं आणि तो विक्रम आपल्या नावावर केला होता.

 

#सी  . आर . राव

 

सी. आर. राव त्यांच्या Theory of Estimation साठी ओळखले जातात.

 

कर्नाटकात जन्मलेले सी. आर. राव 10 भावंडांपैकी आठव्या क्रमांकाचे होते. त्यांनी आंध्र विद्यापीठातून गणितात एम. ए.ची डिग्री घेतली आणि कोलकातामध्ये सांख्यिकी विषयात एम.ए.ची पदवी घेतली होती.

 

त्यांनी एकूण 14 पुस्तकं लिहिली आहेत. अनेक मोठ्या जर्नल्समध्ये त्यांचे 350 रिसर्च पेपर प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांचा अनेक युरोपीय, चीन, आणि जपानी भाषांत अनुवाद झाला आहे. 18 देशांतील विद्यापीठातून त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे.

 

#सी. एस. शेषाद्री

 

सी. एस. शेषाद्री यांनी Algebraic Geometry या विषयात खूप काम केलं आहे. मद्रास विद्यापीठात गणितात पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट पूर्ण केली.

 

याशिवाय त्यांनी शेषाद्री Constant आणि नरायशम शेषाद्री Constant चा शोध लावला. 2009 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

 

माहिती संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.

माहिती स्त्रोत  - विविध लेख व इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून साभार. 

माहिती नावासह Like,  Share  & Forward करण्यास हरकत नाही.