|| श्री ||
आज 19 एप्रिल -
● जागतिक यकृत दिन.
रत्नागिरी जिल्ह्यात-
घडलेल्या महत्वाच्या घटना-
2006 रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाऊन या रत्नागिरी शहरातील नवीन क्लबची स्थापना.
2013 संस्कृती फाउंडेशन, लांजा या लांजा येथील सामाजिक व सांस्कृतिक कार्य करणाऱ्या संस्थेची लांजा येथे स्थापना. संस्थापक - ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक दिग्दर्शक राजेश जगन्नाथ गोसावी .
2019 बोरिवली, मुंबई येथे आयोजित 6 व्या मंडपेश्वर सिव्हीक फेडरेशन राज्य रँकिंग कॅरम स्पर्धेत रत्नागिरीची कॅरम खेळाडू मैत्रेयी दत्तात्रय गोगटे हिचा 4 था क्रमांक.
जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1807 कृष्णाजी सखाराम उर्फ स्वामी शिवानंद टेंब्ये महाराज यांचा पांगरे ता. राजापूर येथे जन्म.
(निधन - 17 जून, 1970).
1966 ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत वासुदेव केळकर ऊर्फ श्याम केळकर यांचा रत्नागिरी येथे जन्म.
(मृत्यू - 12 जानेवारी, 2023).
1981 रत्नागिरी शहरातील महिलांसाठी फोर व्हीलर ड्रायव्हिंग शिकवणाऱ्या पहिल्या महिला अधिकृत मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षक कु. रश्मी महादेव बंदरकर यांचा रत्नागिरी येथे जन्म.
निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1910 क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचा मृत्यू.
(ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले).
(जन्म - 07 जानेवारी, 1891 )
(जन्म - आयनी मेटे ता. खेड ).
1965 मराठा लाईट इन्फंट्री मध्ये तैनात असलेले खेड येथील नायक आनाजी मोरे यांना इंडो - पाक युद्धात वीर मरण आले.