|| श्री ||
आज 13 एप्रिल -
रत्नागिरी जिल्ह्यात-
घडलेल्या महत्वाच्या घटना-
1971 रत्नागिरी जिल्ह्याचे 18 - वे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून एम्. एन्. सिंग यांनी पदभार स्वीकारला.
2002 खलवायन, रत्नागिरी येथील संस्थेची 54 वी मासिक संगीत सभा मुंबई येथील कलाकार प्रल्हाद अडफडकर व सौ. मेधा गोगटे यांच्या गायनाने पार पडली.
2003 रत्नागिरीतील पहिली डान्स अकॅडेमी किरण डान्स अकॅडमीची रत्नागिरी येथे स्थापना. संस्थापक किरण गोपीनाथ बोरसुतकर .
2013 खलवायन, रत्नागिरी येथील संस्थेची 186 वी मासिक संगीत सभा औरंगाबाद येथील कलाकार विश्वनाथ ओक व सौ. राजश्री इंद्रनील देव - ओक यांच्या गायनाने पार पडली.
2016 अखिल भारतीय नाटय परिषदेच्या रत्नागिरी शाखेने आयोजित केलेल्या प्रसिद्ध नाटककार प्र. ल. मयेकर स्मृती नाटय महोत्सवाचे उदघाटन.
2018 परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूणचे अलोरे हायस्कूल, अलोरे या शाळेचे मोरेश्वर आत्माराम आगवेकर असे नामकरण करण्यात आले.
2019 खलवायन, रत्नागिरी येथील संस्थेची 258 वी मासिक संगीत सभा मुंबई येथील कलाकार प्रफुल्ल गोसावी यांच्या बासरी वादनाने पार पडली.
जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1895 भारतात आधुनिक वैद्यक संशोधनाची पायाभरणी करणारे आघाडीचे वैद्यक शास्त्रज्ञ डॉ. वसंत रामजी खानोलकर यांचा मठ ता. रत्नागिरी येथे जन्म.
(मृत्यू- 29 ऑक्टोबर, 1978).
निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1900 वृत्तपत्रकार, मुद्रक, प्रकाशक जनार्दन हरि आठल्ये यांचे निधन.
(जन्म - तारीखअनुपलब्ध, 1826)
(जन्म - शिपोशी ता. लांजा).