|| श्री ||
आज 12 एप्रिल -
रत्नागिरी जिल्ह्यात-
घडलेल्या महत्वाच्या घटना-
2003 खलवायन, रत्नागिरी येथील संस्थेची 66 वी मासिक संगीत सभा पुणे येथील कलाकार सौ. कविता विराज टिकेकर यांच्या गायनाने पार पडली.
2008 खलवायन, रत्नागिरी येथील संस्थेची 126 वी मासिक संगीत सभा कोल्हापूर येथील कलाकार कु. गौतमी चिपळूणकर यांच्या गायनाने पार पडली.
2014 खलवायन, रत्नागिरी येथील संस्थेची 198 वी मासिक संगीत सभा पुणे येथील कलाकार मंदार धनंजय गाडगीळ यांच्या गायनाने पार पडली.
2015 संस्कृती ग्रुप या संस्थेने रत्नागिरीतील छ. शिवाजी स्टेडियम येथे कोकण सुंदरी स्पर्धेचे आयोजन.
जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1943 चिपळूणच्या माहेरवाशीण व लोकसभेच्या माजी
अध्यक्ष सुमित्राताई महाजन यांचा चिपळूण येथे जन्म.
1969 रत्नागिरीतील प्रसिद्ध तबलावादक व फाटक प्रशालेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक मिलिंद माधव टिकेकर यांचा रत्नागिरी येथे जन्म.