आज 29 मार्च - रत्नागिरी जिल्हा दिनविशेष -

● जागतिक पियानो दिवस 

 

■ राष्ट्रीय नौका दिवस 

 

रत्नागिरी जिल्ह्यात - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

2006  दारुल फलह एज्युकेशनल & वेल्फेअर ट्रस्ट, या

सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थेची जामगे ता. दापोली येथे स्थापना.   

 

2008  पुणे येथे आयोजित भारतीय अल्पसंख्यांक संघटना, महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित राज्य रँकिंग कॅरम स्पर्धा, 2008 मध्ये रत्नागिरीची कॅरमपटू मैत्रेयी दत्तात्रय गोगटे हिचा पहिला क्रमांक.   

 

2023  मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या रंगा आण्णा वैद्य आदर्श पुरस्कार या जिल्हा पत्रकार संघासाठी असणाऱ्या पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे अध्यक्ष  शरद पाबळे यांनी याबाबतची घोषणा केली.मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या तालुका, जिल्हा संघांना वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ, रंगाआण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाने परिषदेने दिलेले उपक्रम तंतोतंत राबविले आहेत. विविध सामाजिक उपक्रम राबवून पत्रकारांची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. संगमेश्वर तालुक्यातील वांद्री गाव दत्तक घेऊन पत्रकार संघाने तेथील जनतेला सर्व प्रकारची आरोग्य सुविधा पुरवली आहे. अतिवृष्टीच्या कालावधीत गरजुंना सर्व प्रकारची मदत केली आहे. राजकीय दबावाची पर्वा न करता सौ. जान्हवी पाटील, हेमंत वणजू आदींनी पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्या प्रकरणात निर्णायक भूमिका बजावून कुटुंबियांना मोठी मदत मिळवून दिली.

 

2023  रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 19 - शाळांना आदर्श शाळा पुरस्कार,  2022 - 23 रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी जाहीर केले.  ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांना जि. प.  सेस योजनेंतर्गत आदर्श शाळा पुरस्कार देण्यात येतात.  

■ आदर्श शाळा - कनिष्ठ प्राथमिक शाळा गट - 

01. मंडणगड  तालुक्यातील  जि. प.  शाळा, तिडे बौद्ध वाडी

02. दापोली तालुक्यातील जि. प.  प्राथमिक शाळा मुर्डी क्र. 1 

03. खेड तालुक्यातील जि. प.  प्राथमिक शाळा चिंचघर मेटकर डाऊल 

04. चिपळूण तालुक्यातील जि. प.  प्राथमिक शाळा पोसरे क्र. 2 

05. गुहागर तालुक्यातील जि. प.  प्राथमिक शाळा जानवळे क्रमांक -  3 

06. संगमेश्वर तालुक्यातील जि. प.  प्राथमिक शाळा कोळंबे क्रमांक  - 01 

07. रत्नागिरी तालुक्यातील  जि. प.  प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी 

08. लांजा तालुक्यातील जि. प.  प्राथमिक शाळा बेनी गुरववाडी क्रमांक  - 04 

09.  राजापूर तालुक्यातील जि. प.  प्राथमिक शाळा बेणगी 

■ आदर्श शाळा - वरिष्ठ प्राथमिक शाळा गट -

01.  मंडणगड तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा ढांगर 

02. दापोली तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा कोळबांदरे क्रमांक  - 1 

03. खेड तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा नांदिवली दंड 

04. चिपळूण तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा पोसरे क्रमांक  - 02

05. गुहागर  तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा काजुर्ली क्रमांक  - 02 

06. संगमेश्वर  तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा कोंड्ये क्रमांक  - 02  आणि तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा डिंगणी  - खाडेवाडी 

07.  रत्नागिरी तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा गोळप क्रमांक  - 01

08. लांजा तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा वाकेड क्रमांक  - 01

09.  राजापूर तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा चिखलगाव . 

■ केंद्र प्रमुख पुरस्कार  - 

01.  केंद्र तुळसणी व कोंड्ये क्रमांक  - 01 ता. संगमेश्वरचे केंद्र प्रमुख  संतोष तारवे. 

 

जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती - 

 

1926  विनोदी लेखन करणारे वाचकप्रिय लेखक पांडुरंग लक्ष्मण गाडगीळ तथा बाळ गाडगीळ यांचा अणसुरे ता. राजापूर येथे जन्म. 

(मृत्यू- 21 मार्च, 2010).

 

1959  रत्नागिरीतील प्रतिथयश व्यावसायिक, ज्येष्ठ बॅडमिंटन खेळाडू व अनेक क्रीडा व सामाजिक संस्थांचे आधारस्तंभ असलेले प्रसन्न योगेश्वर आंबुलकर यांचा जन्म.  

 

सूचना -  वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com