आज 23 डिसेंबर - रत्नागिरी जिल्हा दिनविशेष -

रत्नागिरी जिल्ह्यात - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

2006  कै. यशवंतराव पटवर्धन संगीत अकादमी,  रत्नागिरी

या संस्थेची  11 वी मासिक संगीत सभा पुणे येथील कलाकार 

सौ. मानसी  चांदोरकर यांच्या शास्त्रीय गायनाने पार पडली.  

 

2007  दारिद्र्य रेषेखालील बचत गटांविषयी प्रसिद्ध 

केलेल्या माहितीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याच्या 

ग्रामविकास विभागातर्फे दिला जाणारा राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार रत्नागिरीचे ज्येष्ठ पत्रकार प्रमोद 

कोनकर यांना प्रदान. 

 

2007  रत्नागिरी कऱ्हाडे ब्राम्हण सहकारी संघ,

रत्नागिरीतर्फे देण्यात येणारा दर्पण पुरस्कार रत्नागिरी 

येथील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांना देण्यात आला. 

 

2012  म्यानमार पूर्वीच्या ब्रम्हदेशचे राष्ट्राध्यक्ष यू थेन सेन

यांनी थिबा राजवाडा, रत्नागिरीला भेट दिली. 

 

2012 म्यानमार पूर्वीच्या ब्रम्हदेशचे राष्ट्राध्यक्ष यू थेन सेन

यांनी थिबा राजाच्या रत्नागिरी येथील समाधीला भेट दिली. 

 

2012 म्यानमार पूर्वीच्या ब्रम्हदेशचे राष्ट्राध्यक्ष यू थेन सेन

यांनी रत्नागिरी येथील थिबा राजाचे पणतू तसेच अन्य नातेवाईकांची  भेट घेतली. 

 

2014  लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपेराटीव्ह सोसायटी,

बेळगाव या संस्थेतर्फे बाबूराव ठाकूर स्मृती पुरस्कार देण्यात येतात. ह्यामध्ये बाबूराव ठाकूर पत्रकारिता पुरस्कार चिपळूण येथून प्रसिद्ध  होणाऱ्या दैनिक सागरचे संपादक निशिकांत

माधव जोशी तथा नाना जोशी यांना देण्यात आला. 

 

2017  ICAR Directorate of Cashew Research, Puttur, Karnataka issued Certificate of Appreciation to DBSKKV- RFRS, Vengurla as 

the best AICRP Centre on Cashew for the 

Year 2017 - 18 .  

 

सूचना -  वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com