आज 22 डिसेंबर - रत्नागिरी जिल्हा दिनविशेष -

■ राष्ट्रीय गणित दिवस.  

 

रत्नागिरी जिल्ह्यात - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

1978  रत्नागिरी जिल्ह्याचे  25 - वे जिल्हा पोलीसअधीक्षक म्हणून सुधाकर आंबेडकर यांनी पदभार स्वीकारला.  

 

2017  दुबई येथे झालेल्या जागतिक चित्पावन संमेलनात 

अखिल चित्पावन ब्राम्हण विद्यार्थी सहाय्यक संघ रत्नागिरी 

या संस्थेचे कार्यवाह राजेंद्र विष्णू पटवर्धन व कार्यकारिणी 

सदस्य  प्रकाश दामले सहभागी.  

 

2020  INS कुकरी या युद्धनौकेचे  32' मॉडेल जुवे ता.

रत्नागिरी येथे बनवले गेले. या मॉडेलचे अनावरण

दीव दमण येथे करण्यात आले. 

 

2023  रत्नागिरीतील  गोगटे जोगळेकर महाविद्यालयाकडून 

उत्कृष्ट अभिनयासाठी दिले जाणारे सांस्कृतिक वारसा 

जोपासणारे मानाचे दांडेकर मानचिन्ह शुभम आंब्रेला देण्यात आले.  

 

जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती  - 

 

1997   रत्नागिरी जिल्ह्यातील  वेदशास्त्रसंपन्न वेदमूर्ती     

षडंङवित्  हृषीकेश अमित जोशी मु.पो.करजगाव

ता. दापोली  येथे जन्म. 

 

निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती  - 

 

2022  रत्नागिरीचे सुपुत्र लेफ्टनंट अनिल बा. सावंत

(सेवानिवृत्त) भारतीय नौदल यांना पुणे येथे निधन. 

(रत्नागिरीतील जुने डाॅक्टर आणि रत्नागिरी नगर  

परिषदेचे माजी अध्यक्ष डाॅ. बा. ना. सावंत यांचे अनिल हे  

सुपुत्र होत.)

 

सूचना -  वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com