● जागतिक साडी दिवस.
रत्नागिरी जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
1990 पुष्प सम्राट गुलाब हे डाॅ. मु. न. पानवलकर यांच्या
गुलाब फुलांवरील पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे
प्रकाशन.
2000 लक्ष्मी बाळासाहेब नागरी सहकारी पतसंस्था
मर्यादित, चिपळूण या पतसंस्थेची चिपळूण
येथे स्थापना.
2002 रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी मनोज
कोल्हटकर लिखित, दिग्दर्शित, यशश्री
प्रकाशित ' अथांग ' या नाटकाच्या
शुभारंंभाचा प्रयोग खातू नाट्य मंदिर
येथे झाला.
2014 डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे
11 वे कुलगुरू म्हणून डॉ.बी.वेंकटेस्वरालू यांनी
पदभार स्वीकारला.
2020 रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी सौ. अनुया बाम यांना
कीर्तन विशारद पदवी मिळाली .
2020 रत्नागिरी जिल्हा गणेशमूर्तीसंघटना, रत्नागिरी या
संघटनेच्या प्रसिध्दी प्रमुखपदी नाखरे ता.
रत्नागिरी येथील नरेश पांचाळ यांची निवड.
जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1986 रत्नागिरीतील नामवंत हार्मोनियम वादक चैतन्य
पटवर्धन यांचा रत्नागिरी येथे जन्म.
सूचना - वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com