आज 20 डिसेंबर - रत्नागिरी जिल्हा दिनविशेष -

● आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 

 

रत्नागिरी जिल्ह्यात - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

1996  महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान, आळंदी या संस्थेकडून

           देण्यात येणारा वेदव्यास अवॉर्ड व testimonial

           रत्नागिरी येथील वेदमूर्ती विनायकशास्त्री सदाशिव

          आठल्ये तथा आठल्येगुरुजी यांना देण्यात आला.  

 

2003  पावस ता. रत्नागिरी येथील संत स्वामी स्वरूपानंद

           (रामचंद्र विष्णूपंत गोडबोले) यांचे पोस्ट तिकीट

           प्रकाशित.

 

2004  राजापूरच्या गंगेचे आगमन .   

 

2019  राजापूर येथील राजापूर अर्बन को ऑपेराटीव्ह

           बँक लि. राजापूर मधील कारकून रोहित वासुदेव

           सामंत यांना सन 2018 - 19 साठीचा कै.

           बापूरावजी देशमुख उत्कृष्ट नागरी सहकारी बँक

           कर्मचारी पुरस्कार मिळाला.   

 

2021  रत्नागिरी शहरातील प. पू. गगनगिरी महाराज 

          भक्त मंडळ व स्वराभिषेक रत्नागिरी आयोजित

          गंधर्वरत्न कै.  आनंद प्रभुदेसाई स्मृती संतरचित 

          अभंग गायन स्पर्धा पार पडली. सर्व 

          वयोगटांसाठी खुल्या असणाऱ्या या स्पर्धेत 

          रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील 15 - 

          स्पर्धक अंतिम फेरीत दाखल.  

 

2022  रत्नागिरीत झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धेत

           रत्नागिरीतील फाटक हायस्कूलची विद्यार्थानी कु. 

           श्लोका सिद्धार्थ बेंडके हिचा 200 M   बटरफ्लाय 

           मध्ये प्रथम क्रमांक तर, 100M  बटरफ्लाय मध्ये 

           द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. 

 

2022  रत्नागिरी चेस अॅकेडेमीतर्फे आयोजित करण्यात

          आलेल्या कै. अनिल कानविंदे स्मृती जिल्हास्तरीय   

          अमॅच्युअर निवड खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद

           रत्नागिरीच्या सौरिश कशेळकर याने मिळवले. यश 

           गोगटे याने द्वितीय तर अलंकार कांबळे यांनी तृतीय

           क्रमांक मिळवला. रत्नागिरीतील मॅजिक स्क्वेअर 

           चेस अकॅडेमी मध्ये आयोजित करण्यात आलेली या

           वर्षातील अखेरची निवड स्पर्धा होती. या स्पर्धेत 

           एकूण 07 -  फिडे मानांकन खेळाडूंनी आपला 

           सहभाग नोंदवला होता. 

 

जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती  - 

 

1928  कोकण कृषि विद्यापीठ,दापोलीचे माजी कुलगुरू 

          डॉ.  श्रीरंग कद्रेकर यांचा रत्नागिरी येथे जन्म.  

 

निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती - 

 

1933  धालावली ता. राजापूरचे सुपुत्र महाराष्ट्रातील एक

           शांकरमतानुयायी, संस्कृत भाषांतरकार  विष्णू

           वामन बापट यांचे निधन. 

           (जन्म - 22 मे, 1871) 

           (धालावली ता. राजापूर ).

 

2017  खलवायन, रत्नागिरी या संस्थेचे प्रमुख गायक-

           नट , संगीतकार आनंद प्रभुदेसाई यांचे निधन .

           (जन्म- 21 जुलै, 1963).

 

सूचना -  वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com