रत्नागिरी जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
2010 रत्नागिरीतील पुरुष लावणी कलाकार कुणाल
पाटील यांना कोल्हापूर येथे लावणी सम्राज्ञी सुरेखा
पुणेकर यांच्या हस्ते लावणी सम्राट पुरस्कार देऊन
सन्मानित करण्यात आले.
2020 महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाने
गठीत केलेल्या रंगभूमी परीनिरक्षण मंडळावर सदस्य म्हणून रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक अनिल
दांडेकर यांची निवड.
2021 ' देशभक्ती आणि देशभक्त ' या विषयावर नेहरू
युवा केंद्र, रत्नागिरी या संस्थेच्यावतीने जिल्हास्तरीय
वक्तृत्व स्पर्धेचे रत्नागिरी येथील गोगटे - जोगळेकर
महाविद्यालय, रत्नागिरी येथे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत तालुकास्तरावर निवड करण्यात आलेल्या एकूण
10 स्पर्धकांनी त्या - त्या तालुक्याचे प्रतिनिधीत्व करत जिल्ह्यास्तरावर सहभाग घेतला होता.या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपले विचार इंग्रजी व हिंदी मधून मांडले.
स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. सिमरन शेख या लांजा
महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने मिळवला.
2021 ' देशभक्ती आणि देशभक्त ' या विषयावर नेहरू युवा केंद्र, रत्नागिरी या संस्थेच्यावतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे रत्नागिरी येथील गोगटे - जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी
येथ आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत तालुकास्तरावर
निवड करण्यात आलेल्या एकूण 10 स्पर्धकांनी त्या - त्या तालुक्याचे प्रतिनिधीत्व करत जिल्ह्यास्तरावर सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपले विचार इंग्रजी
व हिंदीमधून मांडले. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक कु. सबा
सावकार या रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर
महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने मिळवला .
2021 ' देशभक्ती आणि देशभक्त ' या विषयावर नेहरू युवा केंद्र, रत्नागिरी या संस्थेच्यावतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी
येथे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत तालुकास्तरावर
निवड करण्यात आलेल्या एकूण 10 स्पर्धकांनी त्या - त्या तालुक्याचे प्रतिनिधीत्व करत जिल्ह्यास्तरावर सहभाग
घेतला होता. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपले विचार इंग्रजी व हिंदी मधून मांडले. या स्पर्धेत तृतीय क्रमांक कु.
अंकिता शुक्ला या मंडणगड येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने मिळवला.
2021 चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन या संस्थेने सावर्डे - खरवते ता. चिपळूण येथे डाॅक्टरांसाठी
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामध्ये जिल्ह्यातील 350 डाॅक्टर्स सहभागी झाले होते. या स्पर्धेत
क्रिकेट - कॅरम - टेबल टेनिस-बॅडमिंटन आदि स्पर्धांचा
समावेश होता.
2021 The Best Frame Season 2 Certificate
of Appreciation Best Screenplay Award - awarded to ' पेटारा ' .
2022 चिपळूण येथे झालेल्या रत्नागिरी जिल्हा निवड
चाचणी बाॅडी बिल्डींग स्पर्धेत रत्नागिरीतील प्रणव चंदन
कांबळी यांना किशोर गटात तृतीय क्रमांक.
निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1955 मुद्रक जनार्दन दामोदर गोगटे यांचे निधन.
( जन्म तारीख उपलब्ध नाही).
(जन्म - सोमेश्वर, मूळगाव- मावळंगे
ता. रत्नागिरी).
1956 साहित्य शास्त्र, नीतिशास्त्र व संस्कृती या विषयांचे
लेखक दाजी नागेश आपटे यांचे निधन.
(जन्म - 01 एप्रिल, 1889)
(मूळगाव - मालवे जि. रत्नागिरी).
1996 रत्नागिरीचे सुपुत्र, स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम गणेश
तथा बापू मराठे यांचे शेगांव येथे निधन .
(जन्म - 28 ऑगस्ट, 1917 )
(जन्म - रत्नागिरी).
सूचना - वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com