आज 17 डिसेंबर - रत्नागिरी जिल्हा दिनविशेष -

रत्नागिरी जिल्ह्यात - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

2006  ठाणे येथे प्रथमच ठाणे मॅरेथॉन ट्रस्ट सौजन्य 

महाराष्ट्र असोसिएशन यांच्यावतीने आयोजित करण्यात 

आलेल्या महामॅरेथाॅन स्पर्धेत श्री शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यामंदिर, केळ्ये ता. रत्नागिरी या शाळेचा 

विद्यार्थी राकेश मालप याचा 5-वा क्रमांक  आला.  

 

2006  लांजा तालुका कलाध्यापक  संघाचा लांजा कला 

प्रेमी पुरस्कार लांजा येथील शिक्षक, प्रसिद्ध रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक राजेश जगन्नाथ गोसावी यांना प्रदान. 

 

2018  कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशनने

आयोजित केलेल्या सन 2018 च्या क्रीडा महोत्सवात टेनिस 

बॉल क्रिकेट सामन्यात राजापूर  अर्बन को - ऑपेराटीव्ह 

बँक मर्यादित, राजापूरच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. 

 

2021  मूळच्या कोकणातील आणि कोकणातच रहाणार्‍या कलाकारांनी एकत्र येऊन दूरदर्शनवर सर्वप्रथम संगीत नाटक सादर करण्याचा मान रत्नागिरीतील  राधाकृष्ण कलामंच,रत्नागिरी या संस्थेला मिळाला. राधाकृष्ण कलामंच,

या नाट्यसंस्थेने सं. स्वरसम्राज्ञी हे संगीत नाटक सादर केले.  

 

जन्मलेल्या  प्रसिद्ध व्यक्ती  - 

 

1911  चित्रकार,  लेखक,  दत्तात्रय धोंडो रेगे ऊर्फ डी. डी. रेगे यांचा राजापूर तालुक्यातील पाचल येथे जन्म.  

(मृत्यू  - 02 सप्टेंबर,  1999). 

 

1988  संवादिनी वादक सुशील गद्रे यांचा रत्नागिरी येथे

जन्म .

 

निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती - 

 

1760  नेवरे, ता. रत्नागिरीचे सुपुत्र, पेशव्यांचे सेनापती,

 मराठ्यांचे उत्तरेकडील एक मातब्बर सरदार गोविंद बल्लाळ 

खेर उपाख्य गोविंदपंत बुंदेले यांचे निधन.

(जन्म- 1710)

(जन्मतारीख व महिना उपलब्ध नाही)

(जन्म- नेवरे ता. रत्नागिरी). 

 

1942  डाईंग मास्टर गोपाळ सदाशिव गोगटे यांचे निधन. 

 (जन्म तारीख उपलब्ध नाही). 

 (मूळगाव - मावळंगे ता. रत्नागिरी).

 

सूचना -  वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com