आज 14 डिसेंबर - रत्नागिरी जिल्हा दिनविशेष -

रत्नागिरी जिल्ह्यात - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

2002  खलवायन, रत्नागिरी या संस्थेच्या 62 व्या मासिक संगीत सभेत कोल्हापूर येथील कलाकार  कु. माला आत्माराम पाथरे यांनी सतार वादन सादर केले. 

 

2009  डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान, मार्गताम्हाने ता. गुहागर या संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलची मार्गताम्हाने येथे स्थापना. 

 

2009  दादर, मुंबई येथे शिवाजी पार्क जिमखाना आयोजित 45 व्या महाराष्ट्र राज्य व आंतरजिल्हा कॅरम चॅम्पियनशीप स्पर्धेत रत्नागिरीतील कॅरम खेळाडू मैत्रेयी दत्तात्रय गोगटे हिचा सहभाग. 

 

2013  खलवायन, रत्नागिरी या संस्थेच्या 194  व्या मासिक संगीत सभेत पुणे येथील कलाकार डॉ. रसिका एकबोटे, डॉ. सानिया गोरेगावकर, डॉ. विकास कशाळकर यांनी  ओंकार आदिनाथ हा कार्यक्रम सादर केला. 

 

2014  नांदेड येथे आयोजित महाराष्ट्र राज्य कॅडेट,सबज्युनियर, ज्युनिअर, युथ कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरीची कॅरम खेळाडू मैत्रेयी दत्तात्रय गोगटे सहभागी.

 

2017  भारताच्या संरक्षण खात्याने देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ देवरुख या संस्थेच्या शहीद जवान स्मारक प्रकल्पासाठी T - 55 रणगाडा देण्याचे मान्य केले. 

 

2017  भारताच्या संरक्षण खात्याने देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ देवरुख या संस्थेच्या शहीद जवान स्मारक प्रकल्पासाठी Battle Gun  देण्याचे मान्य केले. 

 

2018  ज्ञानरश्मी वाचनालय, गुहागर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, गुहागर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय साहित्य संमेलनाचे उदघाटन.

 

2019  खलवायन, रत्नागिरी या संस्थेच्या 266 वी मासिक संगीत सभा इस्लामपूर येथील कलाकार  कु. ऋतुजा कुलकर्णी यांच्या गायनाने तर पुणे येथील कलाकार ओंकार कुलकर्णी यांच्या सोलो

तबला वादनाने पार पडली.

 

2019  रत्नागिरी येथील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात कालिदास स्मृती निमित्ताने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचा समारोप. या समारोहाचे हे 63 वे वर्ष. 

 

2019  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित भव्य तिरंगा यात्रा समारोपप्रसंगी कर्तृत्ववान नारी पुरस्कार गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी येथील सहशिक्षिका सौ. स्नेहल संतोष पावरी यांना देण्यात आला.     

 

2022  61 - व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग  +  रत्नागिरी  केंद्रातून युथ फोरम, देवगड या संस्थेच्या 

' निर्वासित  '  या नाटकाला प्रथम क्रमांक. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,  मालवण या संस्थेच्या ' बझर ' या नाटकाला द्वितीय क्रमांक तर स्वराध्या  फाऊंडेशन, मालवण  या संस्थेच्या ' श्याम तुझी आवस इली रे ' या नाटकाला तृतीय क्रमांक जाहीर.  या तिन्ही  नाटकांची अंतिम फेरीसाठी  निवड झाली . एकूण 25 - नाट्य प्रयोग सादर करण्यात आले होते. स्पर्धेचा इतर निकाल - 

□  दिग्दर्शन  - 01. स्वप्नील जाधव  - ' निर्वासित  '

                     02. अभय कदम  - ' बझर '

□ प्रकाश योजना - 01.  श्याम चव्हाण -   ' निर्वासित  '

                           02. श्याम चव्हाण  - ' बझर ' 

□ नेपथ्य  - 01.  अभय वालावलकर  - ' बत्ताशी ' 

                  02. सचिन गावकर  - ' निर्वासित  '

□ रंगभूषा - 01. साबाजी पराडकर - ' संकासुरा ते महावीरा ' 

                 02. आदिती दळवी  - नाटक  -'  बत्ताशी ' 

□ उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक  - 01. प्रफुल्ल घाग 

                          -' निर्वासित  '

                     02.  शुभदा टिकम  - '  बझर ' 

 

     

जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती  - 

 

1995  चिपळूण येथील संवादिनी वादक वरद केळकर 

यांचा चिपळूण येथे जन्म.  

 

सूचना -  वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com