आज 13 डिसेंबर - रत्नागिरी जिल्हा दिनविशेष -

रत्नागिरी जिल्ह्यात - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

1997  खलवायन, रत्नागिरी या संस्थेची 02 री मासिक

संगीत सभा चिपळूण येथील कलाकार चंद्रकांत निमकर 

यांच्या गायनाने संपन्न. 

 

2003  खलवायन, रत्नागिरी या संस्थेची 74 वी मासिक

संगीत सभा कोल्हापूर येथील कलाकार महादेव गणेश तथा M. G. पटवर्धन यांच्या गायनाने संपन्न. 

 

2007  रत्नागिरी येथे आयोजित 43 व्या महाराष्ट्र राज्य व आंतरजिल्हा कॅरम चॅम्पियनशीप स्पर्धेत रत्नागिरीची कॅरम 

खेळाडू मैत्रेयी दत्तात्रय गोगटे  सहभागी. 

 

2008  खलवायन, रत्नागिरी या संस्थेची 134 वी मासिक

संगीत सभा रत्नागिरी येथील कलाकार सौ. मृणाल विनय 

परांजपे यांच्या गायनाने संपन्न. 

 

2014  खलवायन, रत्नागिरी या संस्थेची 206 वी मासिक 

संगीत सभा मुंबई येथील कलाकार सौ. वीणा वायकूळ 

यांच्या गायनाने संपन्न. 

 

2014  महाराष्ट्र अल्पसंख्यांक क्रिस्ती विकास परिषद या शैक्षणिक सामाजिक संस्थेची रत्नागिरी येथे स्थापना. 

 

2014  नांदेड येथे आयोजित 50 व्या महाराष्ट्र राज्य कॅडेट, सबज्युनियर, ज्युनिअर, व युथ कॅरम चॅम्पियनशीप स्पर्धेत युथ गर्ल्स - u/21 गटात  रत्नागिरीतील कॅरम खेळाडू  मैत्रेयी दत्तात्रय गोगटे  हिचा प्रथम क्रमांक. 

 

2019  रत्नागिरी येथील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात कालिदास स्मृती निमित्ताने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचे उदघाटन. या समारोहाचे हे 63 वे वर्ष. 

 

2020  55- व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान

अधिवेशनामध्ये मराठी विज्ञान परिषद या संस्थेकडून 

निसर्गयात्री या रत्नागिरी येथील संस्थेचा सन्मानपत्र देऊन 

गौरव करण्यात आला. 

 

निधन झालेल्या प्रसिद्ध व्यक्ती  - 

 

2010   रत्नागिरीचे पहिले थेट नगराध्यक्ष डॉ. जगन्नाथ

शंकर तथा नानासाहेब केळकर यांचे निधन.  

(जन्म - 17 ऑगस्ट, 1927)

(जन्म - मालगुंड  ता. रत्नागिरी). 

 

सूचना -  वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com