रत्नागिरी जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
1980 डॉ. धनंजय कीर यांना कोल्हापूरच्या शिवाजी
विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचर (D. Lit.) या पदवीने सन्मानित केले.
1998 खलवायन, रत्नागिरी या संस्थेच्या 14 वी मासिक
संगीत सभा कुडावले ता. दापोली येथील कलाकार सौ.
वीणा महाजन यांच्या सुश्राव्य गायनाने पार पडली.
2006 प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या आंतरशालेय
राज्यस्तरीय भावगीत गायन स्पर्धेत 1800 मुलांमधून
आरवली ता. संगमेश्वर येथील गायक प्रथमेश लघाटे याचा
राज्यात प्रथम क्रमांक.
2007 महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे या
शैक्षणिक संस्थेचे एस.ए.एम.परशुराम हॉस्पिटल अँड
रिसर्च सेंटरचे घाणेखुंट ता.चिपळूण येथे उदघाटन.
2009 खलवायन, रत्नागिरी या संस्थेच्या 146 वी
मासिक संगीत सभा कोल्हापूर येथील कलाकार अरुण
माधव कुलकर्णी यांच्या सुश्राव्य गायनाने पार पडली.
2009 महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा, 2009 मध्ये
अभिनयासाठी रौप्यपदक मिळवल्याबद्दल खलवायन,
रत्नागिरी या संस्थेने पूजा सावंत यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
2010 पेण जि. रायगड येथे आयोजित 46 व्या कुमार गट
राज्य अजिंक्यपद व निवड कॅरम स्पर्धा (18 ते 21
वर्षांखालील गटात) या स्पर्धेत 18 वर्षांखालील मुलींच्या
गटात रत्नागिरीतील कॅरम खेळाडू मैत्रेयी दत्तात्रय गोगटे
हिचा तिसरा क्रमांक.
2015 खलवायन, रत्नागिरी या संस्थेच्या 218 व्या मासिक
संगीत सभेत रत्नागिरी येथील व्हायोलिनवादक उदय गोखले यांनी व्हायोलिन वादन सादर केले.
2019 गुहागर येथील प्रसिद्ध लेखक प्रा. बाळासाहेब लबडे
यांची ' पिपिलिका मुक्तीधाम ' या कादंबरीचे ग्रंथाली
प्रकाशन या प्रकाशन संस्थेकडून प्रकाशन.
2021 सिंहगड काॅलेज, केगाव, सोलापूर येथे लाठी
असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने घेण्यात आलेल्या
दुसर्या राज्यस्तरीय लाठीकाठी स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत जिल्ह्याचे नेतृत्व करताना दापोली येथील प्रशिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी
करत 59 - मेडल्सची कमाई करून दुसऱ्या क्रमांकाचे
जेतेपद मिळवले.
2022 चिपळूणचे कला शिक्षक टी. एस्. पाटील यांच्या
बाहुली नाट्याला ' शरद पवार इन्स्पायर फेलोशिप ' प्रदान.
जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1912 सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादक विश्वनाथ कृष्णाजी
जोगळेकर तथा नानासाहेब जोगळेकर यांचा जन्म.
(मृत्यू - 16 एप्रिल, 1982)
(मूळगाव - हेदवी).
निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1975 जलशास्त्र विषयक संशोधक पद्मश्री दिगंबर
वासुदेव जोगळेकर यांचे निधन.
(जन्म - 20 जुलै, 1897)
(मूळगाव - हेदवी).
सूचना - वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद
असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या
सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com