आज - 22 डिसेंबर - सिंधुदुर्ग जिल्हा दिनविशेष   -

सिंधुदुर्ग जिल्ह्यात  - 

 

घडलेल्या महत्वाच्या घटना - 

 

2003  सिंधुदुर्ग जिल्हा एक्स् सर्व्हिस मेन असोसिएशन,  सिंधुदुर्ग या शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या संस्थेच्या सिंधुदुर्ग सैनिक स्कूल या हायस्कूल ची सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथे स्थापना. 

 

2022  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवियत्री सरिता पवार यांना रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय,  कर्जत  जि. अहमदनगर च्या मराठी विभागाच्या वतीने दुर्गा भागवत पुरस्कार जाहीर.  सरिता पवार यांच्या साहित्य लेखनामधील आणि वैचारिक प्रबोधनातील योगदान लक्षात घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला. 

 

2022  भारत सरकार च्या विविध योजना राबविण्यासाठी विकसित केलेल्या यु  डायस प्लस 2022 - 23 टप्पा - 1 मध्ये शाळांची ऑनलाईन माहिती भरण्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. सन 2018 - 19 पासून सलग पाचव्यांदा जिल्हा अव्वल स्थानावर आहे. 

 

निधन  पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती  - 

 

1975  संगीतकार वसंत कृष्णा देसाई यांचे निधन . 

          (जन्म- 1 जून, 1912).

          (जन्म- सोनवडे ता. कुडाळ). 

 

सूचना -  वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com