सिंधुदुर्ग जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
2022 आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या 19 - व्या वर्धापनदिनानिमित्त सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूर - रत्नागिरी - सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील विविध वयोगटातील
धावपटू मोठ्या संख्येने सहभागी.
2022 हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी
संस्था, ओगलेवाडी, कराड व श्री स्वामी समर्थ सेवेकरी
मंडळ राठीवडे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अपंग दिनानिमित्त 12 ते 15 डिसेंबर या कालावधीत श्री स्वामी
समर्थ मठ राठीवडे, मालवण येथे 05 - वे राज्यस्तरीय
दिव्यांगांचे साहसी सहल शिबिराचे आयोजन.
2022 सावंतवाडीतील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा महाराष्ट्र शासनाचा राज्य युवा पुरस्कार विजेते प्रा. रूपेश युवराज
पाटील यांना राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्र राज्य
यांच्या सहकार्याने ऑनररी कॅप्टन आबा पाटील फाऊंडेशन
या संस्थेचा आदर्श अष्टपैलू व्यक्ती पुरस्कार मान्यवरांच्या
हस्ते देण्यात आला.
2022 घुंगुरकाठी सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने कसाल
हायस्कूलच्या सभागृहात घुंगूरकाठी बालकुमार साहित्य
संमेलनाचे आयोजन.
2022 ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय जलतरण
स्पर्धेचा निकाल -
□ 14 वर्षांखालील मुले लहान गट - जितेश उत्तम
केळुसकर, 50 M बॅकस्ट्रोक वैयक्तिक - प्रथम
□ - केशव गणेश साळगावकर , 50 M बॅकस्ट्रोक - द्वितीय
□ 17 वर्षांखालील मोठा गट - सांघिक - पार्थ जितेंद्र
तारी , तेजस शाम कुमठेकर, तेजस पांडुरंग बांदेकर, गुंडू
उत्तम राऊळ ( 4 × 100 ) फ्री स्टाईल रीले - प्रथम
□ वैयक्तिक - तेजस पांडुरंग बांदेकर
200M फ्री स्टाईल- प्रथम
□ - गुंडू उत्तम राऊळ 50 M
बॅकस्ट्रोक - प्रथम
□ - गुंडू उत्तम राऊळ 50 M
बॅकस्ट्रोक - - प्रथम
जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1893 आंतरराष्ट्रीय किर्तीचे भारतीय समाज शास्त्रज्ञ
गोविंद सदाशिव घुर्ये यांचा मालवण येथे जन्म.
(निधन - 28 डिसेंबर, 1983).
1927 संगीतकार एन्. दत्ता यांचा जन्म.
( निधन - 30 डिसेंबर, 1987).
सूचना - वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com