● आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन.
रत्नागिरी जिल्ह्यात -
घडलेल्या महत्वाच्या घटना -
1987 कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे 4 थे कुलगुरू
म्हणून डॉ. श्रीरंग बी. कद्रेकर यांनी पदभार स्वीकारला.
1990 रत्नागिरी येथे भरलेल्या 64 व्या अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलनाचा समारोप.
1993 कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे 5 वे कुलगुरू
म्हणून डॉ. अरविंद जी. सावंत यांनी पदभार स्वीकारला.
2005 खलवायन,रत्नागिरी या संस्थेच्या 98 व्या मासिक
संगीत सभेत पुणे येथील कलाकार डॉ. पुरुषोत्तम विष्णू
गोडबोले यांच्या गायनाने पार पडली.
2006 रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ, रत्नागिरी या
संस्थेचे 31 वे अधिवेशन खेड येथे पार पडले.
2006 रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ ,रत्नागिरी या संस्थेचा उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार माजी खासदार गोविंदराव निकम, सावर्डे यांना देण्यात आला.
2011 खलवायन, रत्नागिरी या संस्थेची 170 वी मासिक
संगीत सभेत रत्नागिरी येथील संगीत शिक्षक विजय रानडे
यांनी जीजीपीएस,रत्नागिरी या शाळेतील बालकलाकारांना
घेवून आयोजित केलेला भावगंध हा गाण्यांचा कार्यक्रम सादर
केला.
2013 ठाणे जिल्ह्यातील कुडूस येथे झालेल्या जिल्हा व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या कुमार व कुमारी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डीतील जिल्हा संघातून समरीन बुरोंडकर व श्रद्धा पवार या कबड्डी खेळाडूंची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड.
2016 खलवायन, रत्नागिरी या संस्थेची 230 व्या मासिक
संगीत सभेत पुणे येथील कलाकार कु. आभा उदय पुरोहित
यांच्या गायनाने पार पडली.
2021 अखिल चित्पावन ब्राम्हण विद्यार्थी सहाय्यक मंडळा
मार्फत 10 - व्या कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
2022 खलवायन, रत्नागिरी या संस्थेची 284 व्या मासिक
संगीत सभेत पुणे येथील कलाकार सौ. सोनाली उपेंद्र
सरदेशपांडे यांच्या गायनाने पार पडली.
जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1990 अभिनेता सिद्धेश पाथरे यांचा रत्नागिरी येथे जन्म.
निधन पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती -
1964 रत्नागिरीचे सुपुत्र, ग्रंथसुचीकार शंकर गणेश दाते
यांचे निधन .
(जन्म- 17 ऑगस्ट, 1905)
(जन्म- रत्नागिरी).
1996 गुहागर तालुक्यातील गिमवी - देवघर परिसरातील
माजी सैनिक महादेव जाधव यांचे निधन.
सूचना - वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके, बातम्या अशा माध्यमातून लोकहितास्तव संपादित केली आहे. सदर माहिती जमा करताना त्यामध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा- ratnagirimedia@gmail. com