आज 20 डिसेंबर -
आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस -
दरवर्षी आज 20 डिसेंबरला देशदेशामध्ये आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस (International Human Solidarity Day) साजरा केला जातो.
लोकांच्या विविधतेमधील एकता महत्व स्पष्ट करत जागरूकता निर्माण करणे हा आजचा आंतरराष्ट्रीय मानव एकता दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. Help4Humen Research & Development या संस्थेने भारतीयांना एकतेच्या सूत्रात बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
22 डिसेंबर 2005 रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेने मानव एकता संदर्भात एक निर्णय करत दरवर्षी 20 डिसेंबरला ' आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस ' साजरा करण्याचे घोषित केले.
फेब्रुवारी 2002 मध्ये दारिद्र्य निर्मुलनासाठी UNDP चा जागतिक एकता कोष स्थापन करण्यात आला आहे.
नवीन शाश्वत विकास उद्दिष्टे ( SDG ) लोक आणि ग्रहावर केंद्रित आहे, ज्यात मानवाधिकाराना पाठबळ दिले जात आहे त्याचबरोबर दारिद्र्य उपासमार आणि रोगराई यामधून लोकांना बाहेर काढण्यासाठीच्या निर्धारासाठी वैश्विक भागीदारीने समर्थित असून त्यादृष्टीने जागतिक सहकार्य आणि एकात्मतेची पायाभरणी केली जात आहे.
जगभरात साजरा होणारा आजचा ' आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस ' हा त्याचाच एक भाग म्हणून साजरा केला जातो.
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.
माहिती स्त्रोत - विविध लेख व इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून साभार.
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.