आज 03 डिसेंबर   -  ●  जागतिक अपंग दिन -

आज 03 डिसेंबर   - 

 

●  जागतिक अपंग दिन - 

 

जागतिक अपंग दिन दरवर्षी 03  डिसेंबर  रोजी जगभरात 

साजरा केला जातो. यानिमित्ताने रत्नागिरीतील आशादीप 

या मतिमंद मुलांसाठी त्यांचा रहिवास व स्वयंरोजगार यासाठी कार्यरत असलेल्या  संस्थेविषयी थोडक्यात माहिती देत आहे.  तसेच संस्थेचे आवाहनही देत आहे.  



गेली सुमारे 21 वर्षे आशादीप ही संस्था आपल्या 

रत्नागिरीमध्ये मतिमंद मुलांसाठी त्यांचा रहिवास व 

स्वयंरोजगार यासाठी कार्यरत आहे. या आशादीप संस्थेचे 

सर्वेसर्वा म्हणजेच संस्थापक ट्रस्टी  दिलीपजी रेडकर 

(मोबाईल नं.  ८४५९३४८९५३) यांनी आपल्या सहकाऱ्यांना 

व आपणास रत्नागिरीकरांना, सोबत घेऊन या मतिमंद 

मुलांच्या संस्थेचे कामकाज चांगल्या प्रकारे चालविण्याचा व  संस्था चांगल्या पद्धतीने कार्यरत ठेवण्याचा आपले परीने प्रामाणिक प्रयत्न केला आहे. 

आज या आशादीप संस्थेमध्ये 22 मतिमंद मुले असून ते 

सर्वजण स्वयंरोजगारासाठी स्वतःचे परीने प्रयत्न करतात. वर्तमानपत्राच्या पेपर बॅग बनविणे, कागदी फुले बनवणे, 

अशा कामातून ते स्वयंरोजगारासाठी आपले परीने प्रयत्न 

करीत असतात. या संस्थेचा सेवक वर्ग देखील या  मुलांप्रती सेवाभाव मनात ठेवून, संस्थेकरिता व मतिमंद मुलांसाठी 

प्रेमाने व आस्थेने संस्थेमध्ये काम करीत आहे. 

या मतिमंद मुलांचा रहिवासासह सांभाळ करणे, त्याचा अशा परिस्थितीत औषधोपचार करणे, त्यांचेकरिता पूर्णवेळ केअर 

टेकर ठेवणे अशा गोष्टींचा वैयक्तिक रित्या खर्च उचलणे त्यांचे पालकांना शक्य होत नाही, म्हणून असे पालक, स्वतःचे 

वयाचा, ताकदीचा व आर्थिक क्षमतेचा विचार करून, 

नाईलाजाने आपल्या आशादीप संस्थेचा मार्ग पत्करतात ही वस्तुस्थिती आहे. आज आशादीप संस्थेकडे अजून दहा 

मुलांचे ॲडमिशन वेटिंग आहे, जागे अभावी व सेवा करण 

अभावी आपण त्या दहा मतिमंद मुलांना सध्या आशादीप 

मध्ये प्रवेश देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

वरील परिस्थितीत संस्थेकडे अशा मुलांच्या पालकांकडून, संस्थेकडे जमा होणारी अनियमित मासिक फी, व कायम 

असणारे स्थिर मासिक खर्च, यांचा मेळ जमाविणे यासाठी आशादीपचे व्यवस्थापनास तारेवरची कसरत सध्या करावी 

लागत आहे. मासिक खर्चासाठी कमी पडणारी रक्कम, 

याकरिता देणगीदारांवर संस्था अवलंबून असते, त्याकरिता, ' आपण सारे मिळून सांभाळूया '  अशी ' आसामिसा योजना ' देखील, आशादीप संस्थेने गेल्या काही दिवसांपासून सुरू 

केली आहे. या योजनेचे सभासदांकडून आशादीप मार्फत 

मासिक देणगी - वर्गणी गोळा केली जाते व ती रक्कम 

मासिक खर्चाचे कामी वापरली जाते व संस्थेचा दैनंदिन 

जादा खर्च भागविला भागविण्याचा प्रयत्न केला जातो. 

 ● आसामिसा - आपण सारे मिळून सांभाळूया योजनेचे सभासदत्व, आपण प्रतिमाह 300/- रुपये इतकी रक्कम, 

देणगी स्वरूपात संस्थेस देऊन, घ्यावे असे मी या अक्षय 

संकल्प पत्राद्वारे आपणा सर्वांना आवाहन करीत आहे. ●

आशादीप संस्थेला या योजनेखाली व नवीन नियोजित 

इमारती निधीला दिलेली अथवा रक्कम स्वरूपातील अन्य देणगीची रक्कम ही करमुक्त आहे.