आज  29 मार्च -  विनोदी लेखन करणारे वाचकप्रिय लेखक  पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचा जन्म जयंती दिन  -

आज  29 मार्च - 

 

विनोदी लेखन करणारे वाचकप्रिय लेखक 

पांडुरंग लक्ष्मण गाडगीळ तथा बाळ गाडगीळ

यांचा जन्म / जन्म जयंती दिन  - 

 

जन्म :  29 मार्च, 1926 

मृत्यू :   21 मार्च , 2010

 

पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचा जन्म 29 मार्च 1926 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील  अणसुरेमध्ये  येथे झाला . 

पांडुरंग लक्ष्मण ऊर्फ बाळ गाडगीळ हे खुमासदार शैलीत विनोदी लेखन करणारे वाचकप्रिय लेखक म्हणून प्रसिद्ध होते. विनोदी कथासंग्रह, प्रवासवर्णन, लेख, व्यक्तिचित्र असे विविध साहित्यप्रकार त्यांनी हाताळले होते. त्यांची 60 हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. 

पुण्यामधल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक, तसंच प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलं. सिम्बायोसिस संस्थेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. 

वकिलांचे विनोद, राजकारण्यांचे विनोद, डॉक्टरांचे विनोद, स्कॉच लोकांचे विनोद, आयरिश विनोद, वेड्यांचे विनोद अशा विविध प्रकारच्या विनोदांचा त्यांनी संकलित केलेला पाच पुस्तकांचा संच लोकप्रिय झाला होता. 

‘सिगरेट आणि वसंत ऋतू’ या त्यांच्या अमेरिकेच्या प्रवासवर्णनाला शासनाचं प्रथम पारितोषिक मिळालं होतं.त्याचप्रमाणे लोटांगण आणि अन्य काही पुस्तकानाही  महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ‘शतकातील साहित्यिक’ म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला होता.

आकार आणि रेषा, अखेर पडदा पडला, अमेरिकेत कसे मरावे, आम्ही भूगोल घडवतो, बबनरावांना शिंगे फुटतात, बॉबी डार्लिंगचे पलायन, बोका शिंके आणि काकवी, चिमणरावाचा नवा अवतार, चोर आणि मोर, दुसरा चिमणराव, एक चमचा ‘पुलं’, एक चमचा अत्रे, फिरकी, हसत खेळत, हसायचं नाही, हसो हसो, हट् म्हणताच गरिबी हटली, होश्शियार निगा रख्खो, माशाचे अश्रू, पाटलांची पीए, शीरसलामत, थ्रील, तू तिथं मी? अजिबात नाही, गप्पागोष्टी, घण एक पुरे प्रेमाचा, मधात तळलेले बदक अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

बडोदे येथे झालेल्या मराठी वाङ्मय परिषदेचे अध्यक्षपद गाडगीळ यांनी भूषविले होते.

मुंबईत 1992 साली भरलेल्या विनोदी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

कोथरूड येथे 1995 साली  झालेल्या कोथरूड साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. 

त्यांचे 21 मार्च  2010 रोजी पुण्यात दुःखद निधन झालं.

 

बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतीस रत्नागिरी मिडीया परिवाराकडून विनम्र अभिवादन  💐🙏🙏🙏💐

 

माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे रत्नागिरी.

माहिती स्रोत - विविध  लेख  व इंटरनेटवर  उपलब्ध माहितीवरून साभार. 

नावासह माहिती Like, Share & Forward  करण्यास हरकत नाही.