आज - 28 मार्च -
रत्नागिरी शहरातील एक उत्कृष्ट टूव्हीलर - फोर व्हीलर मेकॅनिक, चोखंदळ वाचक, बॅडमिंटन खेळाडू, सुजाण नागरिक, शहराचा इतिहास व स्थित्यंतर अचूक माहिती असणारी व्यक्ती, पर्यटनविषयक माहिती व आवड असणारे सुभाष बाष्टे ऊर्फ बंधू बाष्टे यांचा जन्म / जन्म जयंतीदिन -
जन्म - 28 मार्च, 1944
मृत्यू - 20 डिसेंबर, 2023.
सुभाष यांचा जन्म रत्नागिरीत 28 मार्च 1944 रोजी झाला. बंधू म्हणूनच ते अधिक परिचित होते. शालेय शिक्षण रत्नागिरीतूनच रा. भा. शिर्के प्रशाला व पटवर्धन हायस्कूल येथून पूर्ण करून ते मुंबईतील एका प्रसिद्ध मोटर वर्कशॉपमध्ये फोर व्हीलर दुरूस्तीचे प्रशिक्षण घेऊन ते रत्नागिरीत परत आले. त्यावेळी वाहतुकीची साधने म्हणजे व्हाया कोल्हापूर मुंबई अथवा बोट. बर्याचदा कामानिमित्ताने मुंबईत बोटीने जाऊन येत असत. त्यानंतर मग बसने, कारने अथवा मोटरसायकलवरून ते भरपूर प्रवास करत असत. मिश्किल पण स्पष्टवक्तेपणा हा बंधूंचा स्वभाव विशेष.
फोर व्हीलर म्हणजेच कारच्या आवाजावरून त्यातील तांत्रिक बिघाड नक्की करण्यात त्यांचा हातखंडा होता.
समाजातील सर्व स्तरातील लोक त्यांचे मित्र होते. सुभाष यांच्या वडिलांचे रत्नागिरीतील धनजी नाका येथे किराणा मालाचे दुकान होते. परंतु असे असले तरी व मोटर वाहन दुरूस्तीमधील प्रशिक्षण घेऊन रत्नागिरीत स्वतःचे वर्कशॉप सुरू केले.
दुसर्याबद्दल प्रचंड आत्मियता त्यामुळेच निर्माण झालेला
विलक्षण स्नेह आणि परोपकारी स्वभावाने तसेच, स्पॅनरच्या अदभुत कौशल्याने त्यांच्याकडे वयाचे बंधन नसलेला मित्र परिवार आणि स्नेही यांची मांदियाळीच म्हणावी लागेल. त्यात त्या काळातील वरिष्ठ प्राध्यापक, डॅाक्टर, उद्योजक, विविध क्षेत्रात काम करणारे, व्यावसायिक आदि सर्वच बंधूंच्या गॅरेजवर हटकून बंधूना भेटण्यासाठी येत असत. यांत सिगरेट हा कॅामन शौक होता.
सुट्टीच्या दिवशी मोटरसायकलवरून फिरणे हा त्यांचा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. पण मोटरसायकलवरून फिरणे एवढेच नव्हते, ते कार घेऊनही भरपूर प्रवास करत असत.
याव्यतिरिक्त विविध विषयांवरील पुस्तके वाचण्याची त्यांना प्रचंड आवड होती. तसेच चौकस वृत्तीमुळे वेगवेगळ्या ठिकाणचे संदर्भ ते बोलता बोलता देत असत.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी या रत्नागिरीतील प्रतिथयश शैक्षणिक संस्थेच्या नियामक मंडळाचे ते सदस्य होते.
रत्नागिरी शहराचा इतिहास हाही त्यांचा तितकाच आवडीचा विषय. या विषयावर ते तासन्तास बोलायचे आणि तेही संदर्भांसहित.
धार्मिक वृत्तीचे तसेच सनातनी असणाऱ्या बंधूंचे वृध्दापकाळाने 20 डिसेंबर, 2023 रोजी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी व दोन विवाहित मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
बंधूंच्या पवित्र स्मृतीस रत्नागिरी मिडीया परिवाराकडून तसेच वैयक्तिक माझ्या कुटुंबियांकडून विनम्र अभिवादन
💐💐🙏🙏🙏💐💐
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.