जन्म - 19 एप्रिल, 1966
मृत्यू - 12 जानेवारी, 2023
शाम यांचा जन्म रत्नागिरीतलाच. आज 19 एप्रिल, 1966 रोजी सामान्य कुटुंबात झाला. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरीतूनच पूर्ण केल्यावर सुरूवातीच्या काळात छोट्या मोठ्या खाजगी नोकऱ्या करून एका औषध कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होते. परंतु नंतर त्यांनी स्वतःचा मार्केटिंगचा व्यवसाय सुरू केला होता. लहानपणापासूनची आपली अभिनयाची आवड त्यांनी जोपासली होती. राधाकृष्ण कलामंच,या रत्नागिरीतील नाट्यसंस्थेकडून त्यांनी सुमारे 5 - 7 नाटकांमध्ये अभिनय सादर केला होता. परंतु त्यातील पंडितराज जगन्नाथ या नाटकाच्या 10-11 प्रयोगात त्यांचा अधिक सहभाग होता. त्यांनी रंगभूमीची सुमारे 25 - वर्षे सेवा केली आहे. रंगभूमीवर रंगभूमीवरील तसेच पडद्यामागील कलाकार म्हणून त्यांची ओळख होती.
अशा या रत्नागिरीतील हरहुन्नरी कलाकाराचे श्रीकांत वासुदेव ऊर्फ शाम केळकर यांचे रत्नागिरी येथे 12 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
रत्नागिरी मिडीया परिवाराकडून शामरावांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. 💐🙏🙏🙏💐
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.
माहिती स्त्रोत - संजय गणपुले, रत्नागिरी.
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.