आज  - 05 नोव्हेंबर  - रंगभूमी  दिन - ज्येष्ठ महिला रंगकर्मी श्रीम. रेखाताई कोळथरकर -

आज  - 05 नोव्हेंबर  - 

 

रंगभूमी  दिन -  



आजच्या मराठी रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय 

नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेकडून यावर्षीचा रंगभूमी 

दिन इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे 

प्रतिवर्षीप्रमाणे सायंकाळी 05:30 वाजता साजरा होत 

आहे. 

या कार्यक्रमात चिपळूणमधील तीन ज्येष्ठ महिला 

रंगकर्मींचा सत्कार तसेच प्रकट मुलाखत असा कार्यक्रम 

नाट्य परिषद चिपळूण शाखेकडून ठरविण्यात आला आहे. त्याप्रमाणे यावर्षीचा ज्येष्ठ महिला रंगकर्मी सत्कारार्थी 

होण्याचा मान ज्येष्ठ महिला रंगकर्मी श्रीम. रेखाताई 

कोळथरकर यांना मिळाला आहे.  

 

त्यांचा थोडक्यात परिचय  - 

 

रेखा कोळथळकर चिपळूण शहरातील जुना बहिरी येथील कन्या शाळेत शिकत असताना शिवाजीची भूमिका केली त्यानंतर अनेक नाटिकांमध्ये काम केले.इयत्ता नववी दहावीला असताना रत्नागिरी दापोली गुहागर चिपळूण अशा ठिकाणाहून स्त्रीपात्रासाठी विचारणा झाली आपली ताई अशा कलाटे यांच्यासोबत त्या नाटक बघायला जायच्या त्यातून आवड निर्माण झाली आणि त्याही नाटक करायला लागल्या. 

हातखंबा येथील स्पर्धेत फुलाला सुगंध मातीचा हा नाट्यप्रयोग सादर झाल्यानंतर खूप कौतुक झाले बक्षीसही मिळाले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात त्यांनी नाटकातून भूमिका केली आहे.  

रेखा कोळथळकर मुख्य नायिका आहेत असा बोर्ड लागला की प्रेक्षकांची मोठी गर्दी होत असे. तो मी नव्हेच या प्रभाकर पणशीकर यांच्या व्यावसायिक नाटकात त्यांनी मुख्य भूमिका केली आहे.  कोकण -  पुणे  - मुंबई येथे या नाटकाचे दौरे झाले आहेत.  

वाहतो ही  दुर्वांची जोडी या कोल्हापूरला झालेल्या स्पर्धेतील नाटकाचेही कौतुक झाले आजवर  1000+  पेक्षाही अधिक नाटकात  आपला  अभिनय रेखाताईंनी सादर केला आहे.  

अनेक राज्य नाट्य स्पर्धा तसेच,  कामगार कल्याण तर्फे भरविण्यात येणार्‍या नाट्य स्पर्धांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.

अशा या  कर्तृत्ववान ज्येष्ठ महिला रंगकर्मी श्रीम. रेखाताई कोळथळकर यांचे रत्नागिरी मीडिया परिवाराकडून  विशेष अभिनंदन आणि  शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹

 

माहिती  संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे,  रत्नागिरी 

माहिती स्त्रोत  -  योगेश बांडागळे, चिपळूण.

माहिती नावासह Like,  Share  & Forward करण्यास 

हरकत नाही.