आज  - 05 नोव्हेंबर  -  रंगभूमी  दिन - ज्येष्ठ महिला रंगकर्मी श्रीम. कविता पाथरे - रंजना वाडकर

आज  - 05 नोव्हेंबर  -  

 

रंगभूमी  दिन - 

 

आजच्या मराठी रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय 

नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेकडून यावर्षीचा रंगभूमी 

दिन इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे 

प्रतिवर्षीप्रमाणे सायंकाळी 05:30 वाजता साजरा होत 

आहे. 

या कार्यक्रमात चिपळूणमधील तीन ज्येष्ठ महिला 

रंगकर्मींचा सत्कार तसेच प्रकट मुलाखत असा कार्यक्रम 

नाट्य परिषद चिपळूण शाखेकडून ठरविण्यात आला आहे. त्याप्रमाणे यावर्षीचा ज्येष्ठ महिला रंगकर्मी सत्कारार्थी 

होण्याचा मान ज्येष्ठ महिला रंगकर्मी श्रीम. कविता पाथरे - 

रंजना वाडकर  यांना मिळाला आहे.  

 

श्रीम. कविता पाथरे -  रंजना वाडकर यांचा  अल्प परिचय  - 

 

- ⁠- सन  1982 पासून चौदा वर्षे आकाशवाणी रत्नागिरी केंद्रात नभोनाट्य आणि श्रुतिका सादरीकरणात कार्यरत राहण्याचा बहुमान मिळाला. 

- 09 वर्षे एकांकिका स्पर्धांमध्ये  सहभाग. 

- कनकच्या एकांकिका स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयासाठी प्रथम पारितोषिक.

- ⁠सलग तीन वर्षे उत्कृष्ट अभिनेत्री चे प्रथम पारितोषिक प्राप्त. 

- मुंबई दूरदर्शन वरळी येथे चार वर्षे निवेदिका व मुलाखतकार म्हणून काम केले आहे.⁠

- सन  1993 मध्ये दहावीला बोर्डात आलेल्या प्रथम दहा विद्यार्थ्यांची लाइव्ह मुलाखत घेतली, तसेच त्यावेळचे शिक्षण मंत्री श्रीयुत सलीम झकेरिया यांची दूरदर्शनसाठी मुलाखत घेण्याचा बहुमान मिळाला.

- डीबीजे कॉलेज  आंतर विद्यालयीन नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे.

- या सोबतच मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालयीन नृत्यस्पर्धेत सहभाग घेतलेला आहे.⁠⁠⁠

- चांदणे शिंपीत जा, फुलाला सुगंध मातीचा आणि इतर अनेक नाटकांचे प्रयोग चिपळूण, गुहागर, आलोरे, लांजा येथे केले आहेत.⁠

- ओरिएंटल लॉगमन पब्लिकेशन येथे पुस्तके संपादन आणि अनुवादक म्हणून काम केले आहे.

ज्येष्ठ महिला रंगकर्मी श्रीम.  कविता पाथरे -  रंजना वाडकर

यांचे रत्नागिरी मीडिया परिवाराकडून  विशेष अभिनंदन आणि  शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹

 

माहिती  संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे,  रत्नागिरी 

माहिती स्त्रोत  -  योगेश बांडागळे, चिपळूण.

माहिती नावासह Like,  Share  & Forward करण्यास 

हरकत नाही.