आज - 19 ऑक्टोबर -
रत्नागिरी जिल्ह्याचा परिचय भाग - 02
आतापर्यंत बाकी सर्व गोष्टींचा उल्लेख झाला. फळांचा राजा हापूस आंबा हाही रत्नागिरीचा काजू नारळ कोकम कोकणच्या विकासाचा कल्पवृक्ष म्हणून संबोधतात. परकीय चलन मिळवून देणारे कोळंबी तसेच आंबा व कोकम आणि आणि त्यावरील इतर प्रक्रिया उद्योग त्याचप्रमाणे फळे - फुले यामुळे रत्नागिरी ' स्वर्ग से सुंदर ' भासते.
जिल्हा औद्योगिक क्षेत्रातही मागे नाही. जिल्ह्यामध्ये सात औद्योगिक क्षेत्रे कार्यरत आहेत सद्यपरिस्थितीत जिल्ह्यात जवळपास बावीसशे उद्योग कार्यान्वित असून यामुळे सुमारे 16000 रोजगार उपलब्ध झाले आहेत. या उद्योगांमध्ये मत्स्य प्रक्रिया उद्योग केमिकल उद्योग तसेच फार्मासिटिकल उद्योगांचा समावेश आहे.
निर्यातीच्या बाबतीत जिल्हा अग्रेसर असून मत्स्य व इतर प्रक्रिया उद्योगातील वार्षिक निर्यात अंदाजे साडेचारशे कोटी; केमिकल उद्योगांची निर्यात तसेच फार्मासिटिकल उद्योगांची वार्षिक निर्यात महत्वाचे ठरते.
जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळ असून देश - विदेशातील पर्यटक या स्थळांना वेळोवेळी भेटी देत असतात.
प्रमुख पर्यटन स्थळे : -
● मंडणगड - देवाचा डोंगर ; मंडणगड किल्ला ;
बाणकोट किल्ला ; आंबडवे येथील लेणी.
● दापोली - केळशी ; पाज पांढरी; आंजर्ले ; पन्हाळे;
दुर्ग गड ; पालगड ; सुवर्णदुर्ग ;
कनकदुर्ग; फत्तेगड ; गोवा किल्ला;
उन्हावरे मुरुड दापोली येथील लेण्या .
● खेड - चोरवणे ; कर्टेलवाडी ; बेलदार ; सोनगाव;
फुरुस ; महिपतगड ; सुमारगड ;
रसाळगड ; पाल दुर्ग गड ; रघुवीर घाट;
खेड येथील लेण्या .
● चिपळूण - अनारी ; दळवटणे ; गांधारेश्वर; अडरे ;
गोवळकोट गड ; कोळकेवाडी दर्गा;
भैरवगड ; परशुराम मंदिर ; डेरवण ;
सवत कडा ; मौजे तुरंबव येथील
ऐतिहासिक शारदा देवी मंदिर .
● गुहागर - गुहागर ; हेदवी ; भगवानगड ;
प्रचितगड.
● संगमेश्वर - कसबा ; मार्लेश्वर मंदिर .
● लांजा - स्वामी पल्लीनाथ मठ ; साटवली गडी .
● रत्नागिरी - मांडवी ; हातीस ; रत्नदुर्ग गड ; जयगड;
पूर्णगड ; मालगुंड ; निरूळ निवळी
धबधबा; भाट्ये समुद्रकिनारा ; काळबादेवी
येथील कालिका मंदिर व परिसर
समुद्रकिनारा ; गणपतीपुळे येथील
गणपती मंदिर ; तारांगण ; छत्रपती संभाजी
महाराजांचा पुतळा;
● राजापूर - रानतळे ; धोपेश्वर ; आंबोळगड
यशवंतगड ; राजापूर नदी ; राजापूर गंगा
तीर्थ व गरम पाण्याचे कुंड .
याशिवाय रत्नागिरीला विस्तीर्ण सागर समुद्र किनारा लाभला असून या समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे .
-------*****-------
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.