आज 18 डिसेंबर -
स्वातंत्र्य सेनानी पुरुषोत्तम गणेश तथा बापू मराठे
यांचा स्मृतिदिन-
जन्म - 28 ऑगस्ट, 1917 रत्नागिरी
मृत्यू - 18 डिसेंबर, 1996
पुरुषोत्तम गणेश उर्फ बापू मराठे यांचा जन्म रत्नागिरी येथे 28 ऑगस्ट, 1917 रोजी ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांना तीन भावंडे पैकी एक मोठी बहीण व दोन लहान भाऊ. बापू 5 वर्षाचे असतानाच त्यांची आई निवर्तली तर 11 वर्षाचे असताना वडील. मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर सर्व कुटुंबाची जबाबदारी बापूंवरच होती.
कौटुंबिक जबाबदऱ्यांमुळे व परिस्थितीमुळे त्यांचं फारस शिक्षण झालं नाही.जेमतेम तिसरीपर्यंत ते शिकले.
जन्म जरी रत्नागिरीत झालेला असला तरी बापूंचे कार्यक्षेत्र
मात्र दापोली होते. त्यांनी निवडलेल्या दापोली या त्यांच्या कार्यक्षेत्रात ते रत्नागिरीहून दापोलीला कधी आले याची
माहिती मात्र उपलब्ध नाही.
दापोलीत त्यांचं घर आणि शेती. शेती व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असे.
बापू त्यांच्या शेवटच्या काळात बुलढाणा येथे रहात असलेल्या आपल्या मुलीकडे (विजया आहेर) रहायला गेले होते. त्यांचे
स्नेही श्री. वटे यांच्या घरी रहाण्यासाठी शेगाव येथे बापू गेले असताना तिथेच त्यांचे 18 डिसेंबर, 1996 रोजी देहावसान
झाले.