संस्कृत विद्वान व प्राच्यविद्या अभ्यासक, महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे यांचा स्मृतिदिन -
जन्म - 7 मे , 1880
मृत्यू – 18 एप्रिल , 1972
भारतरत्न पुरस्काराने सन 1963 मध्ये सन्मानित .
पांडुरंग वामन काणे यांचा जन्म 7 मे, 1880 रोजी चिपळूण तालुक्यातील पेढेपरशुराम येथे झाला.
विद्यार्थीदशेतच काणे यांना संस्कृतमध्ये उत्कृष्टतेसाठी आणि विशेषतेसाठी 7- सुवर्णपदके मिळाली आणि संस्कृतमध्ये एम.एस. च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून एलएलएमची पदवी प्राप्त केली.
काही काळ रत्नागिरीच्या आणि मुंबईच्या सरकारी विद्यालयांत, तसेच मुंबईच्या एल्फिन्सटन आणि विल्सन महाविद्यालयांत त्यांनी अध्यापन केले. 1911 पासून मुंबईच्या वरिष्ठ न्यायालयात त्यांनी अनेक वर्षे वकीली केली. हिंदू आणि मुसलमान कायद्यांचा त्यांचा विशेष व्यासंग होता. मुंबई विद्यापीठाने आयेजित केलेल्या भाषाशास्त्रविषयक व्याख्यातमालेत (विल्सन फिलॉलॉजिकल लेक्चर्स) संस्कृत आणि तत्संबध्द भाषांवर त्यांनी सहा व्याख्याने दिली (1913).
त्यानंतर महाराष्ट्राच्या प्राचीन भूगोलाच्या विशेष ■संशोधनासाठी त्यांना दोन वर्षे (1915-1916) स्प्रिंगर संशोधन शिष्यवृत्ती मिळाली.■1917 ते 1923 पर्यंत मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिले.■ 1947 ते 1949 या कालावधीमध्ये ते मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरु होते.■ 1959 मध्ये भारतविद्येचे राष्ट्रीय प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. ■1953 ते 1959 सालापर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते.
मुंबई विद्यापीठाने पुढे त्यांना साहित्यातील सन्मानित डॉक्टर (डी. लिट.) ही पदवी दिली. त्यांना भारत सरकारने 'महामहोपाध्याय' या पदवीने सन्मानित केले.
■ उत्तररामचरित (1913 ),■ कादंबरी (2 भाग, 1911 आणि 1918), ■हर्षचरित (2 भाग, 1918 आणि 1921),■ हिंदू प्रथा आणि आधुनिक कायदा (3 भाग, 1944),■ संस्कृत काव्याचा इतिहास (1951) आणि ■धर्मशास्त्र इतिहास (4 भाग, 1930-1953 ) इत्यादी इंग्रजीत संपादन केले आहे.
●डॉ. काणे यांची दैदिप्यमान वाटचाल - ■डॉ. काणे यांनी वेळोवेळी उच्च न्यायालय, मुंबई, सर्वोच्च न्यायालयात वकील, दिल्ली येथील ज्येष्ठ वकील,■ मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातील संस्कृत विभागाचे प्राचार्य,■ बॉम्बे विद्यापीठाचे कुलगुरू, ■ रॉयल एशियाटिक सोसायटीचे (बॉम्बे शाखा) फेलो. ■ उपाध्यक्ष, लंडन स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजचे फेलो, ■राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक .■ पॅरिस, इस्तंबूल आणि केंब्रिज येथे झालेल्या प्राच्यविद्यावादी परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
■ 1953 मध्ये वॉल्टेअर येथे भरलेल्या भारतीय इतिहास परिषदेचे ते अध्यक्ष होते.
■ पुणे येथील भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्याशीही ते दीर्घकाळ निगडीत होते.
काण्यांची सामाजिक आणि धार्मिक दृष्टी पुरोगामी होती. लोणावळे येथील धर्मनिर्णयमंडळाने चालविलेल्या हिंदुधर्मसुधारणेच्या चळवळीत त्यांनी मनःपूर्वक भाग घेतला. अस्पृश्यता, केशवपनादी अनिष्ट चालींचा त्यांनी निषेधच केला. सकेशा विधवेला पंढरपुरात विठ्ठलपूजेचा अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी वकीलपत्र घेतले होते. आंतरजातीय विवाह, विधवाविवाह, घटस्फोट ह्यांचा त्यांनी पुरस्कार केला. 1946 साली नागपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेचे ते अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदांनाही ते भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले (पॅरिस,1948 इस्तंबूल, 1951 केंब्रिज,1954 ). वॉल्टेअर येथे भरलेल्या भारतीय इतिहास परिषदेचे (1953) ते अध्यक्ष होते.
काण्यांचे बरेचसे संशोधनकार्य मुंबईच्या `एशियाटिक सोसायटी’ त झाले. संशोधनकार्यातील विशेष कामगिरीसाठी या संस्थेने आता `काणे सुवर्णपदक’ ठेवले आहे.
अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता आणि ह्या संस्थांना त्यांचे मार्गदर्शन लाभले होते. मुंबईच्या `एशियाटिक सोसायटी’ चे ते फेलो आणि बरीच वर्षे उपाध्यक्ष होते. पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशेधन मंदिराच्या नियामक मंडळावर रेग्युलेटिंग कौन्सिल तसेच तेथील महाभारत संपादन मंडळावरही ते होते. काही काळ ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आणि तिच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य होते. ह्याशिवाय दापोली एज्युकेशन सोसायटी, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयआदि संस्थांचेही ते पदाधिकारी होते.
काण्यांना त्यांच्या हयातीतच अनेक मानसनमान लाभले.
साहित्य अकादमीने 1956 मध्ये धर्मशास्त्राच्या इतिहासावर पाच हजार रुपयांचा साहित्य अकादमी पुरस्कार ( संस्कृत ) देऊन त्यांचा गौरव केला होता. सन 1963 मध्ये भारत सरकारने त्यांचा ' भारतरत्न ' हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव केला.
डॉ. काणे यांचे 18 एप्रिल 1972 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.
पां. वि. काणे सरांच्या पवित्र स्मृतीस रत्नागिरी मिडीया परिवाराकडून विनम्र अभिवादन 💐🌹🙏🙏🌹💐
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी
माहिती स्रोत - विविध लेख व इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून साभार
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.