आज 19 ऑगस्ट - नारळी पौर्णिमा व रक्षा बंधन

आज  19 ऑगस्ट  - 

 

नारळी पौर्णिमा व रक्षा बंधन 

 

हिंदू बांधवांचे सगळेच सण पर्यावरणाशी तसेच,  निसर्गाशी  निगडीत असल्याचे आपण जेव्हा वेगवेगळ्या सणांची माहिती 

घेतो तेव्हा आपल्या लक्षात येते. निसर्ग हा माणसा करता सतत सकारात्मक रहावा, त्याची कायम आपल्यावर कृपादृष्टी /  छत्रछाया रहावी म्हणून हे सण उत्सव आपण सर्वच जण कायमच पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरे करत आलो आहोत. 

 

श्रावण पौर्णिमा याच दिवशी बहुतेक वेळा राखी पौर्णिमाही असते  तशी ती यावर्षीही आहे. यादिवशी बहिणी भावाला राखी बांधून ओवाळतात, या विधीला रक्षाबंधन म्हणतात.  मूळ उत्तर भारतातील असलेला हा सण आता उर्वरित भारतातही साजरा केला जातो.   

पावसाळ्यामध्ये  समुद्रात मासेमारीसाठी जाणे धोकादायक असते, सामान्यपणे श्रावणी पौर्णिमेनंतर पावसाचा जोर बऱ्याच प्रमाणात कमी झालेला असतो अशावेळी कोळी लोक किंवा मच्छीमार बंधू समुद्रात जाण्यास सिद्ध होतात.  

समुद्र हे वरूण देवतेच्या वास्तव्याचे ठिकाण मानले जाते.  समुद्राची कृपा रहावी म्हणून रीतसर पूजा करून या दिवशी नारळ समुद्राला अर्पण करण्याची प्रथा आहे.  यादिवशी नैवेद्य म्हणून नारळाचे वेगवेगळे पदार्थ अर्पण करतात. जास्त करून नारळाचा भात नारळी भात म्हणून प्रसिद्ध आहे, ओल्या नारळाच्या करंज्या अशा विविध नारळाचे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात.  नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपत्तीजनक यमलहरींना आधिक्‍य असते.  या लहरी ब्रह्मांडात भोवऱ्याप्रमाणे  वेगवान असतात. वरूण देवता ही जलावर ताबा मिळवणारी तसेच त्याचे संयमन करणारी मानली जाते.  यादिवशी सागररूपी वरुणदेवतेला नारळ अर्पण करून ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या यमलहरींना ताब्यात ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते.  

नारळातील पाण्यात तेजतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. हिंदू 

धर्मात सर्वच पूजाविधींमध्ये  नारळाला फार महत्व आहे.  

नारळाला श्रीफळ असेही म्हणतात. श्री म्हणजे लक्ष्मी आणि 

फळ म्हणजे नारळ. 

नारळाच्या अनेकविध गुणांमुळेच नारळाला पवित्र फळ म्हणून मान्यता आहे. नारळात अनेक औषधी गुण असतात नारळाचे पूजन म्हणजेच निसर्गाचे पूजन जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नारळी पौर्णिमा सण साजरा केला जातो .

 

माहिती संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे,  रत्नागिरी. 

माहिती स्रोत - विविध लेख,इंटरनेट यावरील उपलब्ध माहितीवरून साभार.  

माहिती नावासह Like,  Share & Forward करण्यास हरकत नाही.