आज 23 नोव्हेंबर - आज 23 नोव्हेंबर रत्नागिरी येथील " चेसमेन " या बुद्धिबळाशी निगडीत संस्थेचा 24 वा वर्धापन दिन -

आज 23 नोव्हेंबर रत्नागिरी येथील ' चेसमेन '  या 

बुद्धिबळाशी निगडीत संस्थेचा 24  वा वर्धापन दिन - 

 

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बुद्धिबळ या खेळाचा प्रचार व प्रसार 

व्हावा या उद्देशाने रत्नागिरी येथे चेसमेन या संस्थेची 23 

नोव्हेंबर, 2000 रोजी स्थापना झाली. संस्था स्थापनेचे हे 

24 वे वर्ष आहे. पुढील वर्षी ही  संस्था आपला रौप्य 

महोत्सव साजरा करेल.  

संस्था आज  25 व्या वर्षात पदार्पण करत आहे. रत्नागिरी 

येथील प्रसिद्ध उद्योजक व खेळाविषयी प्रेम असणारे, 

बॅडमिंटन पटू प्रसन्न आंबुलकर यांच्या अध्यक्षतेखाली 

उपाध्यक्ष मिलिंद मिरकर, कोषाध्यक्ष दिलीप टिकेकर, 

सचिव सुहास कामतेकर व इतर सदस्य सुभाष शिरधनकर, 

सचिन देसाई, विक्रांत फडके, प्रसन्न कांबळी या सर्वांना 

सोबत घेऊन रत्नागिरी येथे स्थापन केली.

गेल्या 24  वर्षांच्या संस्था स्थापनेपासूनच्या कालखंडात 

संस्थेने  (कोरोना काळ वगळता) विविध बुद्धिबळ 

स्पर्धांचे  यशस्वी आयोजन केले आहे. जिल्हा स्तरापासून 

राष्ट्रीय स्तरावरील विविध रेटिंग टूर्नामेंटचे आयोजन 

केले आहे.  

आर. बी. सप्रे मेमोरियल या ल्यूटर फायनल रेटिंग ही राष्ट्रीय स्तरावरील रेटिंग स्पर्धेचे आयोजन संस्था गेली 7 वर्षे करत 

आहे. या स्पर्धेसाठी भारताच्या विविध राज्यांचे खेळाडू 

सहभागी होतात. 

उल्लेखनीय बाब म्हणजे - महाबलीपुरम चेन्नई (तामिळनाडू) 

येथे झालेल्या 44 व्या जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड 

स्पर्धेमध्ये रत्नागिरीच्या आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहनी 

यांनी पंच कामगिरी उत्तमरीत्या पार पाडली.विवेक यांनी 

स्पर्धेचे नियोजन करणाऱ्या चमूत देखील सहभाग घेतला 

होता. त्यासाठी स्पर्धेआधी तीन महिने चेन्नई येथे वास्तव्यास होते.विवेक यांच्या पंच कारकिर्दीला प्रारंभ चेसमेन रत्नागिरी 

या संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धांपासून झाला होता, 

पुढे जाऊन विवेक यांनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 

स्तरावरील स्पर्धांमध्ये पंच कामगिरी पार पाडली व पाडत असतात. 

यावर्षी रत्नागिरीतील ज्येष्ठ बुद्धिबळपटू व चेसमेन 

संघटनेचे स्थापनेपासून खजिनदार राहिलेले बॅन्क ऑफ 

इंडियामधील निवृत्त अधिकारी कै. दिलीप श्रीपाद 

टिकेकर यांच्या स्मरणार्थ '  कै. दिलीप श्रीपाद टिकेकर 

बुद्धिबळ वाचनालय ' या बुद्धिबळ खेळातील विविध 

पुस्तके व मॅगेझिन्स असलेले वाचनालयाचे मॅजिक 

स्क्वेअर  चेस अॅकेडेमी, नाचणे रोड येथे 26 जानेवारी,  

2024 पासून सुरू केले आहे. 

या वाचनालयाचा उद्देश नवीन, उदयोन्मुख तसेच, खेळत असलेल्या खेळाडूंना बुध्दीबळ या खेळाविषयी आवड 

निर्माण व्हावी आणि खेळताना चांगले मार्गदर्शन व्हावे 

या उद्देशाने बुध्दीबळ खेळाविषयी माहितीपर पुस्तके व 

मॅगेझिन्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 

जेणेकरून आपल्या खेळात अचूकता आणणे खेळाडूंना 

सोपे होईल.  

त्याचप्रमाणे ठाणे येथील बुद्धीबळप्रेमी आदित्य फडके 

यांनी रत्नागिरीतील एका खेळाडूला यंदापासून (सन - 

2024 पासून) दरवर्षी स्कॉलरशिप सुरू केली आहे. 

वर्षभरात जो खेळाडू आपल्या खेळाचे चांगले प्रदर्शन 

करेल त्याला वार्षिक ₹. 25000/= एव्हढी स्कॉलरशिप मिळणार आहे. स्कॉलरशिपचे हे पहिलेच वर्ष आहे. 

सदर स्कॉलरशिपसाठी रत्नागिरीतील एक गुणवान युवा बुद्धिबळपटू सौरिश कशेळकर हा कै. लीला रामचंद्र 

फडके बुद्धिबळ शिष्यवृत्तीचा पहिला मानकरी ठरला.  

 

चेसमेन संस्थेला वर्धापन दिनाच्या रत्नागिरी मीडिया

                 परिवाराकडून अनेक शुभेच्छा 💐💐💐

 

माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.

माहिती स्रोत - सुहासराव कामतेकर, रत्नागिरी .

माहिती नावासह Like,   Share & Forward  करण्यास हरकत नाही.