आज  06 डिसेंबर - मानवतेतून समाजकारण करणाऱ्या राजरत्न प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचा आज वर्धापन दिन.

आज  06 डिसेंबर - 

 

मानवसेवा हीच समाजसेवा एवढेच व्रत जपत समाजकार्य करणारी सामाजिक संस्था म्हणजेच रत्नागिरी येथील राजरत्न प्रतिष्ठान. मानवतेतून समाजकारण करणाऱ्या राजरत्न प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचा आज वर्धापन दिन. 

 

● पुढील वर्षी ही संस्था दशकपूर्ती करेल. ●

 

संस्था 06 डिसेंबर, 2015 रोजी स्थापन झाली. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन सदानंद शिंदे हे आहेत. सदर संस्थेचे सध्याचे अध्यक्ष रूपेश सावंत हे आहेत.  

 

ही संस्था मनोरुग्ण, पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, बेवारस अंत्यसंस्कार, गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण,  सार्वजनिक आरोग्य, नदी पुनरूज्जीवन आणि पर्यावरण संरक्षण यासाठी कार्यरत आहे . 

संस्थेच्या स्थापनेपासून संस्था समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे. 

संस्थेचे अध्यक्ष म्हणून रूपेश सावंत तर उपाध्यक्ष म्हणून सतीश राणे, सचिव पदी उमेश देसाई  व खजिनदार म्हणून संतोष  ( बॉंड) सावंत हे काम पाहतात. रस्त्यावर फिरणारे मानसिक रुग्ण, अनाथ लोकांना सुधारून पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे किंवा योग्य ती वैद्यकीय मदत मग त्या रुग्णाच्या परिस्थितीप्रमाणे मनोरुग्णालयात दाखल करणे असो किंवा योग्य प्रकारचे औषधोपचार असोत त्या परिस्थितीनुरूप त्यापद्धतीचे संस्था पर्यायाने संस्था कार्यकर्ते उपलब्ध करून देतात किंवा त्या रुग्णाला परत त्यांना त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यातही देतात.आज त्यांच्याबरोबर संस्थेचे जवळपास 50 हून अधिक कार्यकर्ते जिल्हाभर काम करतात. संस्थेचे काम हे शहरापुरते मर्यादित नसून जिल्हाभरात चालू असते.  रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर,  सांगली या जिल्ह्यांमध्ये राजरत्न प्रतिष्ठान हा त्यांचा उपक्रम राबवत असतात. 

या संस्थेने आतापर्यंत भरीव कामगिरी केली असून 182 रुग्णांना  दिलासा दिला आहे.यापैकी 80 रुग्ण पूर्णपणे बरे  होऊन मनोरुग्णालयातील अधिकायांच्या समन्वयाने नातेवाईकांचा शोध घेऊन संपूर्ण भारतात त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात संस्थेने दिले आहेत. हे सर्व काम करत असताना संस्थेचे कार्यकर्ते शासनाचे सर्व नियम पाळून काम करतात हे विशेष.  राजरत्नच्या सदस्यांनी रुग्णसेवा तसेच वृद्धाश्रम आणि महिलाश्रमात असलेल्यांची यथाशक्ती सेवा करण्यास सुरुवात केली आहे. संस्थेचे कोरोना काळातही आरोग्यसेवेचे काम सुरूच होते.   

राजरत्नचे काम सर्वश्रुतच आहे. संस्थेचे असंख्य सहकारी / कार्यकर्ते कार्यरत आहेत. सर्वांची नावे देणे जरी शक्य नसले तरीही काही नावे देत आहे - अनिरुद्ध (छोटू)  खामकर , गजानन अहिर, ऐश्वर्या गावकर, अश्विनी रहाटे,  हेमंत चव्हाण,  अमोल शिंदे,  तन्मय सावंत, मयुरेश मडके,सुबान तांबोळी,  सौ. राही  सावंत, सौ. जया डावर,असे एकूण 57 सभासद आहेत. ह्या कार्यकर्त्यांचे वैशिष्ट्य असे की हे सर्वजण प्रसिद्धीपरांन्मुख राहून व मदतीशिवाय केवळ कर्तव्य भावनेने करत आहेत. 

या सर्व कामांचा विचार करून अनेक पुरस्कार राजरत्न संस्थेला मिळाले आहेत. 

● राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांची महाराष्ट्र शासनाच्या समितीवर अभिनंदनीय निवड झाली आहे. समाजकारणातून राजकारणाकडे असा उद्देश न ठेवता गेली 8 - 9 वर्षे मानवतेतून समाजसेवा एवढेच ध्येय  ठेवून रत्नागिरी शहरात तसेच जिल्ह्यात ज्यांनी काम केले अशा संस्थेची  महाराष्ट्र शासनाच्या मानसिक आरोग्य आढावा मंडळ या शासन नियुक्त समितीच्या  कोल्हापूर विभागाच्या विभागीय समितीवर स्वतः मनोरुग्ण किंवा काळजीवाहू किंवा आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी म्हणून राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्षांची  विशेष अभिनंदनीय निवड झाली आहे. ही निवड 5 वर्षांसाठी आहे.  

● 2022 -  महासंस्कृती व्हेंचरकडून महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. दीपकजी केसरकर यांच्या हस्ते ' कोकण सन्मान, 2022 ' पुरस्कार या संस्थेला मिळाला आहे. 

 

राजरत्न प्रतिष्ठान, या संस्थेला व त्यांच्या मानवतावादी  समाज सेवेला रत्नागिरी मीडिया परिवाराकडून अनेक शुभेच्छा 

🌹🌹🙏🙏🌹🌹

 

माहिती संकलन- दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी. 

माहिती नावासह Like,  Share & Forward  करण्यास 

हरकत नाही.