आज - 29 नोव्हेंबर - सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे , ता. चिपळूण या शिक्षण संस्थेचा 67 वा वर्धापन दिन -

आज - 29 नोव्हेंबर -

 

सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे , ता. चिपळूण 

या शिक्षण संस्थेचा 67 वा वर्धापन दिन - 

 

ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची दालने उपलब्ध 

व्हावीत त्यांना अधिकाधिक चांगले शिक्षण मिळावे ही 

दूरदृष्टी ठेवून सन  1957 साली सह्याद्रीच्या कुशीतील 

सावर्डे या गावी स्वर्गीय गोविंदराव निकम यांनी सह्याद्री 

शिक्षण संस्था स्थापन करून न्यू इंग्लिश स्कूल सुरू केले 

आणि शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. 

 

आज संस्थेचा विस्तार खूप मोठा आहे. 

 

प्रामुख्याने सुरुवातीपासून या संस्थेला महाराष्ट्र राज्याचे 

तत्कालिन कृषिमंत्री स्व. डॉ. बाळासाहेब सावंत यांचे 

मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभलेलं आहे. तसेच, 

महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत 

यांचेही सहकार्य मिळाले आहे. त्याचप्रमाणे माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री 

अजितदादा पवार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य 

मिळत असते. 

 

आज  संस्थेचे संस्थापक स्व. गोविंदराव निकम यांचे सुपुत्र 

व  चिपळूण - संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखरजी 

निकम हे यशस्वीपणे संस्थेची धुरा सांभाळत आहेत. 

 

आज संस्था प्राथमिक शिक्षणापासून ते  विविध पदवी व 

पदव्युत्तर अभासक्रम शिकवले जातात. पहिली ते चौथी 

प्राथमिक शाळा असून मराठी व सेमी इंग्लिश माध्यमाचे 

वर्ग असणाऱ्या दोन्ही शाळा आय. एस. ओ. मानांकन 

प्राप्त आहेत. संस्थेची 33 माध्यमिक विद्यालये असून 02 शासनमान्य भागशाळा आहेत. उच्च माध्यमिक 

शिक्षणासोबतच व्यवसाय शिक्षणही दिले जाते. आय. टी. 

आय. तंत्रनिकेतन याही शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध 

असून, कला विज्ञान महाविद्यालय तसेच एम. बी. ए. अभ्यासक्रमाची उपलब्धता तर आहेच, शिवाय 

फार्मसीसाठीचे डिप्लोमा - डिग्री - एम. फार्म शिक्षणाची 

संधी उपलब्ध आहे. डी. एड.- बी. एड . कॉलेज व एम. 

एड. अभ्यासकेंद्र सुरू केले आहे. कला शिक्षण 

विभागातील विविध अभ्यासक्रम उपलब्ध असून हॉटेल 

मॅनेजमेंट अँड टुरिझमचा (तीन वर्षांचा डिग्री कोर्स) 

अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. 

 

वरील अभ्यासक्रमांव्यतिरिक्त कृषी शिक्षणावर आधारित अभ्यासक्रमही शिकवले जातात. ज्यामध्ये कृषी 

तंत्रनिकेतन, उद्यानविद्या महाविद्यालय,अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय,  कृषि जैव तंत्रज्ञान विषयक अभ्यासक्रम 

यांचा समावेश आहे.  

 

तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मान्यतेने कृषी महाविद्यालय ही सुरू केले आहे. 

 

संलग्न विविध शाळा व महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी विद्यार्थिनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत असतात. त्यात 

काही प्राविण्यही (राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर) मिळवत 

असतात. त्यांना चालना व प्रोत्साहन देण्यासाठी आत्ता 

इनडोअर स्टेडियम बांधून पूर्ण झाले आहे. 

 

संस्थेचे शिक्षक व कर्मचारीही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 

सहभाग नोंदवत असतात. मुख्यत्वे करून विज्ञान 

मेळाव्यात सहभाग घेतला जातो आणि प्राविण्यही 

मिळवतात. 

 

विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी 

एकूण 14 - वसतिगृहांची सोय उपलब्ध आहे. 

 

सामाजिक बांधिलकीतून पर्यावरणाचे महत्व पटवून 

देण्यासाठी सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे व बायफ 

डेव्हलपमेंट रिसर्च फौंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जलजीवन अमृत घनकचऱ्याचे व्यवस्थापन या 

विषयांतर्गत टाकाऊ पदार्थापासून गांडूळ खत कंपोस्ट 

खत निर्मिती, औषधी वनस्पती लागवड आदि कार्यक्रम 

राष्ट्रीय पर्यावरण जागृती मोहिमेअंतर्गत संस्थेच्या विविध विद्यालये / महाविद्यालयांच्या माध्यमातून राबविला 

जात आहे.

 

सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाच्या रत्नागिरी मीडिया परिवाराकडून अनेक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹

 

माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी 

माहिती नावासह Like,  Share & Forward  करण्यास 

हरकत नाही.