आज - 18 ऑक्टोबर - रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यायाने शहरातील पहिले संगीत विद्यालय रत्नागिरी चे आज 81 - व्या  वर्षात पदार्पण -

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यायाने शहरातील पहिले संगीत विद्यालय रत्नागिरी येथे 18 ऑक्टोबर, 1944 रोजी संगीत शिक्षक विनायक बुवा लक्ष्मण रानडे व त्यांचे बंधू भालचंद्र बुवा यांनी सुरू केले.आज हे संगीत विद्यालय  81 - व्या  वर्षात पदार्पण करत आहे.  

 

आज संस्थापक रानडे बंधूंपैकी दोघेही हयात नाहीत.  आता रत्नागिरी शहरातील प्रतिथयश संगीत प्रशिक्षक विजयजी रानडे हे त्यांच्या पिताश्री व काकांच्या पश्चात संगीत शिक्षणाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. ते स्वतः हार्मोनियम मधील पहिले संगीत अलंकार पदवीप्राप्त आहेत.  

 

सदरचे संगीत विद्यालय संगीत क्षेत्रातील एक परिपूर्ण संगीत विद्यालय म्हणून ओळखले जाते. या संगीत विद्यालयात हार्मोनियम, तबला, पखवाज वादनाचे परिपूर्ण प्रशिक्षण दिले जाते.

 

आजपर्यंत या विद्यालयातून अनेक कलाकार घडले असून बहुतांश विद्यार्थी कलाकारांनी संगीत क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल केले आहे / करत आहेत.  

 

संगीत विद्यालयाच्या 80 - व्या  वर्धापनदिनाला  रत्नागिरी मिडीया परिवाराकडून तसेच वैयक्तिक आमच्या कुटुंबियांकडून अनेक शुभेच्छा  💐💐💐

 

माहिती संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे,  रत्नागिरी.

माहिती स्त्रोत  -  विजय  रानडे सर,  रत्नागिरी.

माहिती नावासह Like, Share  & Forward करण्यास हरकत नाही.