आज - 16 डिसेंबर - शतकपूर्तीकडे वाटचाल करत असलेली संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ, देवरुख ही संस्था -

आज - 16 डिसेंबर  - 

 

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ, देवरुख या संस्थेचा स्थापना 

दिन - 

 

देवरुख आणि परिसरातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास 

व्हावा या हेतूने सन 1927 मध्ये या शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेची स्थापना झाली. 

देवरुख मधील त्याकाळातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात देवरुख च्या उन्नतीचे काम घडावे या विचाराने प्रेरित होऊन 

मा. काकासाहेब पंडित, लोकसभेचे पहिले सभापती 

दादासाहेब मावळणकर, विनायकराव केतकर, दादासाहेब 

पित्रे, रावसाहेब कुलकर्णी आदि प्रभृतींनी एकत्र येत 

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची देवरुख येथे 

स्थापना केली. 

आज या संस्थेच्या अधिपत्याखाली अनेक संस्था कार्यरत 

असून नर्सरी ते पी. जी. पर्यंत शिक्षणाची सोय इथे उपलब्ध 

आहे. 

संस्था म्हणून मध्यंतरीच्या काळात संस्थेने उत्तम प्रगती 

साधली. मात्र सदानंद भागवत सरनी संस्थेचे अध्यक्ष 

म्हणून सामान्यपणे  वीस वर्षे संस्थेची धुरा 

सांभाळल्यापासून संस्थेच्या प्रगतीत मोलाची भर पडत 

गेली. संस्थेने शैक्षणिक व सामाजिक नवनवीन प्रकल्प 

हातात घेऊन पूर्णत्वाला नेले आहेत. 

ठळकपणे नमूद करायचे झाल्यास न्यू इंग्लिश स्कूल 

हायस्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, विद्यावाचस्पती 

केन्द्र, इंग्रजी माध्यम शाळा, कला दालन, शहीद जवान 

स्मारक, कोकणातील पहिले व्यावसायिक शिक्षण केंद्र ,सार्वजनिक संस्थेने उभारलेले राज्यातील सर्वात मोठे 

विज्ञान केंद्र, क्रिडा अकादमी  ही होत.कोकणातील पहिले 

स्वायत्त महाविद्यालय होण्याचा मानही या संस्थेकडे जातो.

 

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ, देवरुख या संस्थेच्या 97व्या वर्धापनदिनाला  रत्नागिरी मिडीया परिवाराकडून अनेक 

शुभेच्छा  💐🙏🙏🙏💐

 

माहिती संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी. 

माहिती नावासह Like,  Share  & Forward करण्यास 

हरकत नाही.