आज 21 डिसेंबर - रत्नागिरी येथील प्रसिद्ध संवादिनी वादक चैतन्य प्रमोद पटवर्धन यांचा वाढदिवस -

आज  21  डिसेंबर - 

 

रत्नागिरी येथील प्रसिद्ध संवादिनी वादक  चैतन्य प्रमोद 

पटवर्धन यांचा वाढदिवस - 

 

जन्म -  21 डिसेंबर, 1986

 

चैतन्य यांचा जन्म 21 डिसेंबर, 1986 रोजी दापोली येथे 

झाला. शालेय शिक्षण ए. जी. हायस्कूल, दापोली येथे 

घेतले. त्यानंतर गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी 

येथून बी. एस्सी. पर्यंतचे  पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर 

मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील उपकेंद्रामधून M. Sc. 

in Environmental Science चा पदव्युत्तर अभ्यासक्रम 

पूर्ण केला आहे. 

सध्या चैतन्य  'चैतन्य केमटेक ' या नावाने रत्नागिरी येथील एम.आय.  डी.  सी. मध्ये स्वतःचा केमिकल उत्पादन 

निर्मितीचा व्यवसाय करतात.  

संवादिनी वादनाची आवड चैतन्य यांना शालेय 

जीवनापासूनच होती . 

संवादिनीचे प्रारंभिक शिक्षण दापोली येथील भागवतसर 

आणि नीळकंठ गोखले यांच्याकडे घेतले. त्यानंतर काही 

काळ चैतन्य यांनी  विरार, मुंबई येथील पं. मनोहर चिमोटे यांच्याकडे संवादिनी वादनाचे धडे गिरवले.  त्यानंतरचे 

शिक्षण रत्नागिरी येथील नामवंत शिक्षक विजय रानडे 

यांचेकडे आणि मुंबई येथील पं. विश्वनाथ कान्हेरे यांचेकडून 

घेतले आहे. 

चैतन्य हे 1996 पासून संवादिनी वादन करत आहेत. 

खलवायन, रत्नागिरी या संस्थेच्या बहुतेक मासिक संगीत 

सभेत चैतन्य यांनी साथसंगत करत आहेत. 

आजपर्यंत अनेक कीर्तन, भावगीत, नाट्यसंगीत, इत्यादि कार्यक्रमांमध्ये देशविदेशात साथसंगत चैतन्य यांनी केली 

आहे. 

अनेक ठिकाणी स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला असूनत्यामधील विशेष उल्लेखनीय बक्षिसे - 

 

■ 2008  मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात 

हार्मोनियम सोलो वादनासाठी मेडल. आतापर्यंत

 रत्नागिरी जिल्ह्यातील हे सोलो वादनासाठीचे पहिलेच पारितोषिक.

 

■ महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या युवा 

महोत्सवात राज्यस्तरीय प्रथम क्रमांक. 

 

रत्नागिरी मीडिया परिवारातर्फे चैतन्य यांना  वाढदिवसाच्या 

अनेक शुभेच्छा  💐🌹🎂🍩🌹💐

 

माहिती संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.

माहिती नावासह Like,  Share  &  Forward करण्यास हरकत नाही.