आज - 19 एप्रिल - रत्नागिरी शहरातील महिलांसाठी फोर व्हीलर ड्रायव्हिंग शिकवणाऱ्या पहिल्या महिला अधिकृत मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षक कु. रश्मी महादेव बंदरकर यांचा आज वाढदिवस -

जन्म  - 19 एप्रिल, 1981

 

रश्मी ह्यांचा जन्म रत्नागिरीतील आहे. शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी येथून डिप्लोमा घेतलेल्या रश्मी यांचे प्राथमिक 

शालेय शिक्षण परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिर येथून तर माध्यमिक शिक्षण रत्नागिरीतीलच फाटक प्रशालेमधून घेतले आहे. शालेय जीवनात खेळ व सांस्कृतिक विषयांची आवड होती.  खेळांमध्ये  क्रिकेट  - कॅरम  - खोखो यांमध्ये अधिक आवड होती. परंतु यापैकी खोखो  या खेळात त्यांनी शालेय खोखो संघात सहभाग घेतला होता.  पेंटिंग - हस्ताक्षर  - वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.  त्याबरोबरच आवड म्हणून फॅशन डिझायनिंगचा बेसिक कोर्स पूर्ण केला.  कुकिंग हा आवडीचा विषय त्यामुळे नवनवीन डिशेस करून द्यायचा आनंदही घेतला.  

याशिवाय नृत्याची आवड म्हणून कथ्थक  या नृत्य प्रकाराचे शिक्षण सध्या मोटर ट्रेनिंगचा व्यवसाय सांभाळून घेत आहेत हे विशेष.  

सामाजिक कार्याचीही आवड असून काॅलेजमध्ये असताना रोटरॅक्ट क्लबची सेक्रेटरी म्हणून काम पाहिले आहे. 

महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना Aptech Computer Institute मधून काॅम्प्युटर ट्रेनिंग पूर्ण केले आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर अॅपटेक व एनआयआयटी या काॅम्प्युटर शिकवणाऱ्या संस्थांमधून काॅम्प्युटर प्रशिक्षणाचे काम केले.  ह्या नोकऱ्या करताना स्वतःची काॅम्प्युटर ट्रेनिंग सेंटर चालू करण्याचा विचार केला होता परंतु तो सफल होऊ शकला नाही.  परंतु त्याचा जास्त विचार  केला नाही.  

घरी नुसतेच बसून काय करणार याचा विचार करून 2004 मध्ये  ओळखीच्या एक दोन महिलांना टुव्हीलर चालवण्याचे प्रशिक्षण दिले. त्यातूनच आपण मोटर ट्रेनिंग स्कूल सुरू करुन  लोकांना चांगल्या प्रकारे 4 - व्हीलरचे ट्रेनिंग स्कूल सुरू करू ही संकल्पना पुढे आली आणि त्यांनी आपले ज्येष्ठ बंधू सचिन यांच्यासोबत 'बंदरकर मोटर ट्रेनिंग स्कूल  ' या ट्रेनिंग स्कूलची संकल्पना प्रत्यक्षात उतरली.  

अर्थातच ह्यासाठी बंधू सचिन यांचेबरोबरच आई व बहिणीचाही सकारात्मक पाठिंबा मिळाला आणि जरूर त्या सर्व सरकारी / तांत्रिक गोष्टी पूर्ण करून सन 2009 मध्ये व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.   

हा व्यवसाय हा मोटर वाहन विभागांतर्गत येत असल्याने त्या विभागाचे सहाय्यही तत्कालिन Dy.  RTO अनिल वळीवसर तसेच सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक संजय कांबळेसर,  मुख्य लिपिक चंद्रशेखर नरसाहेब आणि पूर्ण RTO आॅफिसचे सुरू करताना तर मिळालेच परंतु आजही मिळत आहे.  

व्यवसाय सुरू केला त्यावेळी रश्मी ह्याच रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या अधिकृत महिला 4 - व्हीलर मोटर ट्रेनिंग देणाऱ्या प्रशिक्षक ठरल्या. काळानुरूप आता ह्या व्यवसायात स्पर्धा आली आहे. 

गेली  15 - वर्षे (कोविड - 19 कोरोना काळ वगळून) यात सातत्य दाखविल्याने आतापर्यंत सुमारे  500 पेक्षा अधिक महिलांना रश्मी यांनी यशस्वीरित्या प्रशिक्षित केले असून त्या सर्वजणी आपल्या आपण ड्रायव्हिंग करतात हीच कामाची पोचपावती. 

□ महिला व पुरुषांसाठी  स्वतंत्र प्रशिक्षकासह  स्वतंत्र बॅचेस  

□ संपूर्ण शहरात म्हणजेच वर्दळीच्या रस्त्यावर अरुंद घाट रस्त्यावर प्रशिक्षण  □ नाईट ड्रायव्हिंगचा अनुभव □ सोयीनुसार बॅचेस  अशा वैशिष्ट्यांसह आज रश्मी आपले बंधू सचिन यांचेसह  '  बंदरकर मोटर ट्रेनिंग स्कूल  ' हा व्यवसाय, रत्नागिरीतील मारूतीमंदिर येथील साई रत्न अपार्टमेंट येथे चालवत आहेत. फोर व्हीलर मोटर ट्रेनिंगसह रश्मी व सचिन यांच्या भगिनी प्राची ह्या महिलांना टूव्हीलर मोटर ट्रेनिंग देतात. 

 

रश्मी यांना रत्नागिरी मिडीया परिवाराकडू वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 💐🍩🎂🍩💐

 

माहिती संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे,  रत्नागिरी.

माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.