आज   - 16  डिसेंबर  - चिपळूण येथील कीर्तन भास्कर, कीर्तन केसरी, संगीत विशारद, कीर्तन प्रशिक्षक ह.भ.प. महेश बुवा काणे यांचा वाढदिवस  -

आज   - 16  डिसेंबर  - 

 

आज चिपळूण येथील कीर्तन भास्कर, कीर्तन केसरी, 

संगीत विशारद, पाच राज्यांत कीर्तन व प्रवचन सेवा करणारे कीर्तनकार व प्रवचनकार, कीर्तन प्रशिक्षक ह.भ.प. महेश बुवा काणे यांचा वाढदिवस  - 

 

जन्म  - 16 डिसेंबर,  1968.

 

महेश यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजेच 16 डिसेंबर 

रोजी खेड येथे झाला. प्राथमिक शिक्षण आंबवली या 

गावी पूर्ण करून माध्यमिक शालेय शिक्षण अण्णासाहेब 

वर्तक विद्यामंदिर, विरार येथून पूर्ण केले आहे. 

महेश यांचे वडील शिक्षक होते. घरी महेश यांच्या 

व्यतिरिक्त कीर्तन सेवेत प्रत्यक्ष सहभागी नसले तरीही 

घरचे वातावरण धार्मिक स्वरूपाचे असल्याने त्यांना लहानपणापासून गायन व कीर्तनाची आवड होती. 

महेश यांचे कीर्तनातील गुरू प्रसिद्ध कीर्तनकार कै. नरेंद्र 

बुवा हाटे, मुंबई हे होत.  यासोबतच चालू असलेल्या 

संगीत शिक्षणासाठी म्हणून संगीतातील गुरू मुंबई 

येथील डाॅ. श्रीम. कविता गाडगीळ ह्या होत. 

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई या 

विद्यापीठाची संगीत विशारद पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त 

केली आहे. संगीत अलंकार चार अभ्यास गुरूवर्या सौ.

मुक्ता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. 

गेली 25 - 27 वर्षे त्यांची कीर्तन सेवा अव्याहत सुरू 

आहे. महाराष्ट्र,  गोवा, कर्नाटक, हैदराबाद (तेलंगणा), 

गुजरात या राज्यांमध्ये गेल्या 25 - वर्षांत 3500 

कीर्तन व प्रवचन सेवा घडली असून अनेक 

पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. 

दासबोधाचा तसेच, गीताधर्म मंडळातर्फे गीताव्रती, 

ज्ञानेश्वरी प्रबोध, तुकाराम गाथा प्रवेश, श्री वाल्मिकी 

रामायण कथाहे अभ्यासक्रम ही यशस्वीरित्या पूर्ण केले 

आहेत.  

कीर्तन सेवेव्यतिरिक गोपमेळा परिवार आयोजित 

कीर्तनातील संगीत तसेच, कीर्तन प्रशिक्षण वर्ग आणि 

कार्यशाळा यात संचालक आणि प्रशिक्षक म्हणून 

सहभाग. तसेच अनेक कीर्तन स्पर्धेत सहभाग, राष्ट्रीय 

लेखन स्पर्धेत सहभाग,  कीर्तन लेखनात यशस्वी 

सहभाग.  

अखिल भारतीय कीर्तन संस्था, दादर यांचे दूरस्थ अभ्यासक्रमातंर्गत दापोली, चिपळूण आणि रत्नागिरी 

येथे  संचालक आणि प्रशिक्षक म्हणून कार्यरत.  

महाराष्ट्र शासनाच्या विविध कला महोत्सवात अनेक 

ठिकाणी सहभाग घेतला आहे. 

महेश आकाशवाणी केंद्र रत्नागिरी येथे ' बी ' ग्रेड 

कलाकार म्हणून मान्यताप्राप्त कलाकार आहेत.  

आतापर्यंत अनेक विद्यार्थी महेश यांचेकडून कीर्तन सेवा 

प्रशिक्षण यशस्वीरित्या  घेऊन बाहेर पडले आहेत.  

रत्नागिरी, दापोली, चिपळूण येथील जवळपास 50 - 

पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कीर्तन विशारद पर्यंत तर सुमारे 

15 - जणांनी कीर्तन अलंकार पदवीपर्यन्तचे शिक्षण पूर्ण 

केले आहे. याव्यतिरिक्त मुंबई,  पुणे,  सोलापूर यासारख्या भाषांमधून कीर्तन अभ्यासासाठी मुले येत असतात .

आजपर्यंत महेश यांची खालील पाच पुस्तके प्रकाशित 

झाली आहेत  - 

● जानेवारी, 2021 - वंदू गणेशु भाग - 1 

● डिसेंबर,  2021 - वंदू गणेशु भाग - 2 

● जानेवारी, 2023  - शेगावीचा राणा 

● ऑगस्ट,  2023  -नमो देव्यै महादेव्यै

●  मे,  2024   - सुपुत्र संसारी 

 

' वंदू गणेशु भाग -  3 '  हे पुस्तक  प्रकाशनाच्या वाटेवर 

आहे.  

 

आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यापैकी निवडक  - 

■ 2005 श्रीसिद्धिविनायक ट्रस्ट,  कोल्हापूर या संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त सन्मान. 

■ 2006 तपोधाम प्रकल्प,  आयनी मेटे यांचा देवर्षि नारद पुरस्कार 

■ 2007 लोकमान्य नगर इंदौर भक्तमंडळ, यांचेकडून कीर्तन केसरी पदवी.

■ 2009  उज्जैन कीर्तन संमेलनात कीर्तन विशारद ही पदवी.

■ 2014  नारद मंदिर,  पुणे यांचेकडून कीर्तन भास्कर ही पदवी. 

■ 2018  काणे कुल प्रतिष्ठान पुणे यांचेतर्फे सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित. 

■ 2019  नारद मंदिर,  पुणे यांचेकडून कीर्तन भूषण ही पदवी. 

■ 2022  कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यालय,  रामटेक,  शाखा रत्नागिरी यांचेतर्फे सांस्कृति संवर्धन पुरस्काराने सन्मानित. 

■ 2023  संस्कार भारती चिपळूण यांचेकडून कीर्तन क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित.  

 

हे सर्व सांभाळून विविध विषयांवर महेश प्रवचन निरूपणासह करत असतात. सध्या आरवली ता. संगमेश्वर येथील श्री सूर्यनारायण मंदिरात भागवत सप्ताह सुरू आहे. 

 

महेश बुवांना रत्नागिरी मिडीया परिवाराकडून वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 💐🌹🍩🎂🌹💐

 

माहिती संकलन  - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.

माहिती नावासह Like,  Share  & Forward करण्यास हरकत नाही.