आज - 10 डिसेंबर -
मुंबई दूरदर्शन, वृत्तविभागाचे वरिष्ठ पत्रकार, MMC
News Network.com या वृत्तसंस्थेचे संपादक
मिलिंद लिमये सर यांचा वाढदिवस -
जन्म - 10 डिसेंबर, 1965
मिलिंद यांचा जन्म डोंबिवली येथे 10 डिसेंबर, 1965 रोजी
झाला. सरांचे मूळगाव दापोली आहे. शालेय शिक्षण
डोंबिवली येथून पूर्ण केले असून मुंबई विद्यापीठाची B.
Com. पदवी घेतली आहे. त्याशिवाय Bachtler in
Mass Communication n Journalism
(B. M. C. J.) हा पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला
आहे.
शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरुवातीला काही वर्षे खीरा स्टील
वर्क्स प्रा. लि. व कॅडबरी इंडिया लि. या खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी केली. परंतु मुळात पत्रकारितेची आवड असल्याने
सन 1991 आधी दै. मुंबई सकाळ, आणि नंतर दै. महाराष्ट्र
टाईम्स मध्ये बातमीदारी केली. पुढे सन 2000 मध्ये
सुरुवातीला वृत्त निवेदक आणि बातमीदार म्हणून
नियुक्ती झाली. तेव्हापासून आजतागायत
गेली 24 वर्षे मिलिंद सर दूरदर्शनसाठी महाराष्ट्र
विधिमंडळ अधिवेशन बातमीदारी करत आहेत.
दूरदर्शन वृत्त विभागासाठी निवडणूक आधारित जनादेश
या कार्यक्रमासाठी सलग गेली पाच लोकसभा आणि
विधानसभा निवडणुकांसाठी समन्वयक म्हणून काम
करत आहेत.
गेली 33 - वर्षे मिलिंद सर पत्रकारितेत कार्यरत आहेत.
भाईंदर प्रेस क्लब आणि मीरा भाईंदर वार्ताहर संघाच्या
अध्यक्ष पदी आणि सरचिटणीस पदावर काम करत असलेले
मिलिंद सरांनी सन 2021 - 23 या काळात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणी समितीवर सदस्य म्हणून काम केले आहे.
नोकरी सांभाळून MMC News Network.com या
वृत्तसंस्थेचे संपादक पद सांभाळतात.
मिलिंद सरांना रत्नागिरी मीडिया परिवाराकडून वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा 💐🌹🍩🎂🌹💐
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.