आज - 06 डिसेंबर -
ज्येष्ठ रंगकर्मी, गायिका, अभिनेत्री, शास्त्रीय संगीत
गायिका आणि प्रशिक्षक सौ. संगीता भालचंद्र बापट
(पूर्वाश्रमीच्या कु. संगीता विजय पटवर्धन) यांचा
वाढदिवस -
जन्म - 06 डिसेंबर, 1970
संगीता यांचा जन्म रत्नागिरी येथे 06 डिसेंबर, 1970
रोजी सांगीतिक वारसा असलेल्या विजयराव पटवर्धन
यांच्या घरात झाला. त्यांचे आजोबा कै. यशवंतराव हे
ग्वाल्हेर घराण्याचे गायक होते. वडील कै. विजयराव
यांचा गळा उपजतच मुलायम व फिरता होता.
सहाजिकच संगीता यांनाही गायनाची
लहानपणापासूनच शास्त्रीय तसेच नाट्य संगीताची
आवड निर्माण झाली. त्यामुळे संगीतातील प्रथम
गुरू हे आजोबा कै. यशवंतराव आणि वडील कै.
विजयराव हे होत. त्यानंतर सौ. मृणाल परांजपे व
सौ. मुग्धा सामंत - भट हे आहेत.
संगीता यांचे शालेय शिक्षण फाटक हायस्कूलमध्ये
झालेले असून त्यांनी B. Com. ही पदवी
रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून
घेतली आहे.
त्याबरोबरच संगीत क्षेत्रातील गांधर्व महाविद्यालयातून
विशारद व त्यानंतर अलंकार पदवी प्राप्त केल्या आहेत.
तसेच M. A. (संगीत) ही पदवी प्राप्त केली आहे.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देवरुख येथील बाळासाहेब
पित्रे संगीत कला अकादमीमध्ये संगीत प्रशिक्षण वर्ग
घेतले. सुमारे 20 - वर्षे रत्नागिरीतील कै. यशवंतराव
पटवर्धन संगीत कला अकादमीमध्ये परीक्षा विभाग
प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. सध्या G. G. P. S.
या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गुरुकुल विभागात
संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
आजवर अनेक संगीत राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला आहे.
रत्नागिरी येथील राधाकृष्ण कला मंच या संस्थेने सादर
केलेल्या ' संगीत सूर संजीवनी ' या संगीत नाटकातील
त्यांना गायनाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
संगीता यांना दोन मुलगे असून दोघेही उच्चशिक्षित आहेत.
दोघेही परदेशी असल्याने संगीता यांनी आवड म्हणून
' अन्नपूर्णा फूडस ' या नावाने केटरिंग व्यवसाय करतात.
त्यांच्या सांगीतिक तसेच व्यावसायिक उन्नतीसाठी सासर
तसेच माहेरहून पूर्ण पाठिंबा मिळतो.
सौ. संगीता ताईंना रत्नागिरी मीडिया परिवाराकडून
वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा
💐🌹🍩🎂🌹💐
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.